Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पक्षातील बड्या नेत्याचा दावा; आव्हाडांना गृहनिर्माण खातं हवं होतं

पक्षातील बड्या नेत्याचा दावा; आव्हाडांना गृहनिर्माण खातं हवं होतं

कोल्हापूर, 26 ऑगस्ट : अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी पुन्हा एकदा जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. आव्हाड यांनी शरद पवारांवर काय जादू केली माहिती नाही, त्यांनी ठाण्यामध्ये संपूर्ण राष्ट्रवादी पक्ष संपवला आहे.

एकनाथ शिंदे गुहाटीला गेले त्यावेळी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी सत्तेत सहभागी होण्यासाठी पाठिंब्याचं पत्र दिलं होतं. त्यावर जितेंद्र आव्हाड यांची देखील सही होती. त्यावेळी ते गृहनिर्माण खातं हृदयाला कवटाळून बसले होते असा गौप्यस्फोट मुश्रीफ यांनी केला आहे.पुढे बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले की, आम्ही अजितदादांसोबत का गेलो हे आधीही सांगितलं आहे. आमचा निर्णय पक्षाच्या विस्तारासाठी आहे.


हा सामूहिक निर्णय आहे, असं मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. दरम्यान मुश्रीफ यांच्या या टीकेला आता आव्हाड काय प्रत्युत्तर देणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.दरम्यान दुसरीकडे अजितदादा हेच आमचे नेते असल्याचं सुप्रिया सुळे यांनी दोन दिवसांपूर्वी म्हटलं होतं. राष्ट्रवादीमध्ये कुठेही फूट पडली नसल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. त्यानंतर शरद पवार यांनी देखील राष्ट्रवादीमध्ये कोणतीही फूट पडली नाही, असं म्हटलं आहे. जेव्हा एखादा मोठा गट पक्षाच्या बाहेर जातो तेव्हा पक्षात फूट पडली असं म्हणतात. मात्र आमच्यातील काही जणांनी वेगळी भूमिका घेतली एवढंच, त्यामुळे पक्षात फूट पडली असं म्हणता येणार नसल्याचं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे. पवारांच्या या वक्तव्यानंतर चर्चेला उधाणा आलं आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.