विवेकानंद वैद्यक प्रतिष्ठान संचलित, विवेकानंद रुग्णालयातील नेत्र विभागाचे उद्घाटन
विवेकानंद वैद्यक प्रतिष्ठान संचलित, विवेकानंद रुग्णालयातील नेत्र विभागाचे उद्घाटन व विवेकानंद कौशल्य विकास प्रशिक्षण संस्था अंतर्गत कोर्स पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम संपन्न झाला.
अत्याधुनिक मशीन व साहित्य हे ॲटलास कॉपको इंडिया लि. यांच्या सहकार्याने आज हे विभाग सुसज्ज आहे.या विभागा मार्फत आगामी काळात गरीब व गरजू रुग्णांकरिता अत्यल्प दरात अथवा योजने अंतर्गत मोफत सेवा सुरू आहे.. विवेकानंद कौशल विकास प्रशिक्षण संस्था:- या प्रकल्पासाठी देखील ॲटलास कॉपको इंडिया लि. यांनी भरपूर सहकार्य केले. यामाध्यमातून अनेक तरुणांनी वैद्यकीय क्षेत्रातील कौशल्य कोर्सेस पूर्ण करून ते हॉस्पिटलमध्ये काम करत आहेत. तर यामुळे काहीजण काम करत करत पुढील उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी याचा फायदा होत आहे.आज वरील दोन्ही कार्यक्रम विवेकानंद हॉस्पिटलमध्ये संपन्न झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री. कबीर गायकवाड (H R Head ॲटलास कॉपको इंडिया लि.), मा. डॉ. विक्रमसिंह कदम (सिव्हील सर्जन ,सांगली), मा. श्री. अभिजित पाटील (CSR Manager ॲटलास कॉपको इंडिया लि.) व मा. श्री. सतिशजी मालू ( उद्योजक, सांगली) हे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते नेत्र विभागाचे फित कापून उद्घाटन संपन्न झाले. सर्व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. ॲटलास कॉपको इंडिया लि. कडून संस्थेला आजवर केलेल्या भरीव मदतीबद्दल त्यांना आभार पत्र .(Token Of Gratitude ) हे संस्थचे अध्यक्ष डॉ.आर.डी श्रीवास्तव व सचिव डॉ. राम लाडे यांनी प्रदान केले.त्याचे वाचन डॉ.शुभांगी पाटील यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक ही डॉ. राम लाडे यांनी केले.त्यानंतर मुलांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. पाहुण्यांचे व स्किल डेव्हलपमेंट कोर्स मधील मुलांचे मनोगत झाले नंतर श्री गोविंद जोशी यांनी वयक्तिक सेवा गीत सादर केले. यावेळी संस्थचे कोषादध्यक्ष श्री अंबादास माळी, संचालक श्री एल व्ही कुलकर्णी, श्री मंदार बन्ने ,सौ संगीता विभूते, तसेच ओंकार देशपांडे, सौ राधिका देशपांडे, श्री अनिल मोरे ,सौ तेजस्विनी वाटावे, सौ रोहिणी रत्नपारखी, सौ वैशाली मोहिते , सर्व विभाग प्रमुख, स्किल डेव्हलपमेंट चे सर्व विद्यार्थी ,लक्ष्मी प्रभा नर्सिंग इन्स्टिट्यूट चे सर्व विद्यार्थी व शिक्षक स्टाफ , संस्थेचे हितचिंतक व कार्यकर्ते या कार्यक्रमात उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सौ दीपाली भिंताडे यांनी केले त्यांना सौ स्वाती अहिवळे यांनी सहकार्य केले व आभार श्री मनोज कांडकर यांनी मानले. हा कार्यक्रम याशस्वी पार पाडण्यासाठी डॉ सतीश कदम, शुभम उपाध्ये, अशोक वाघमोडे, राहुल आगळे, निलेश कांबळे, रेखा मोहिते, सुनंदा माळी यांनी मोलाचे योगदान दिले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.