Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कॉंग्रेस लागली कामाला; टीम खर्गे सज्ज: तरूण नेत्यावर मोठी जबाबदारी

कॉंग्रेस लागली कामाला; टीम खर्गे सज्ज: तरूण नेत्यावर मोठी जबाबदारी
 

काँग्रेसने रविवारी आपली नवीन वर्किंग कमिटी जाहीर केली. पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह माजी अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि राहुल गांधी यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांचा समावेश आहे. पक्षाचे संघटनेचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीनुसार, काँग्रेस कार्यकारिणीत ३९ सदस्य, ३२ स्थायी निमंत्रित आणि नऊ विशेष निमंत्रितांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये तरूण नेत्यांनाही संधी देण्यात आली आहे.

प्रियंका गांधी वड्रा, ए. के. अँटनी, मीरा कुमार आणि काँग्रेसच्या चारही संघटनांचे प्रमुख- युवक काँग्रेस, एनएसयूआय, महिला काँग्रेस आणि सेवा दलाचेही पदसिद्ध सदस्य असतील. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे  यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या निवडणुकीनंतर पदभार स्वीकारला. तब्बल 10 महिन्यांनंतर त्यांनी कार्यकारिणीची स्थापना केली.

समितीतील एकूण 39 सदस्यापैकी तीन सदस्य 50 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. त्यामध्ये सचिन पायलट, गौरव गोगोई आणि कमलेश्वर पटेल यांचा समावेश आहे. मणिपूरच्या मुद्यावरून विरोधी पक्षांनी केंद्र सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला होता. तो प्रस्ताव माडतांना गौरव गोगोई यांचे भाषण चांगलेच गाजले होते. तर सचिन पायलट हे राजस्थानमधील पक्षाचा महत्त्वाचा चेहरा आहेत. निवडणुकीच्या तोंडावर त्यांची नाराजी दुर करण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला आहे.

काँग्रेसच्या नव्या कार्यकारिणीतील ३९ सदस्यांची यादी

पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह, माजी अध्यक्षा सोनिया गांधी , खासदार राहुल गांधी, अधीर रंजन चौधरी, एके अँटोनी, अंबिका सोनी, मीरा कुमार, दिग्विजय सिंह, पी. चिदम्बरम, तारिक अन्वर, पु. लालथनहवला, मुकुल वासनिक, आनंद शर्मा, अशोक चव्हाण, अजय माकन, चरणजीत सिंह चन्नी, प्रियांका गांधी वाड्रा, कुमारी शैलजा, गईखंगम गंगमई, एन. रघुवीरा रेड्डी, शशी थरूर, ताम्रध्वज साहू, अभिषेक मनु सिंघवी, सलमान खुर्शीद, जयराम रमेश, जितेंद्र सिंह, रणदीप सिंह सुरजेवाला, सचिन पायलट, दीपक बाबरिया, जगदीश ठाकोर, जीए मीर, अविनाश पांडे, दीपा दास मुन्शी, महेंद्रजीत सिंह मालविय, गौरव गोगोई, सय्यद नसीर हुसैन, कमलेश्वर पटेल, के. सी. वेणुगोपाल यांचा समावेश आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.