Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

तुम्हाला माहितीये का? कोळंबीचे हृदय तिच्या डोक्यात का असते?

तुम्हाला माहितीये का? कोळंबीचे हृदय तिच्या डोक्यात का असते?

फिश डिश मधली कोळंबी डिश ही सगळ्यांची आवडती डिश आहे. कोळंबी हा मासा छोटासा पण भन्नाट टेस्टी लागतो. कोळंबी हा प्रकार वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो. कोळंबी हा मासा आपल्याकडे खूप चवीने खाल्ला जातो. कोळंबीला खवय्यांची मोठी मागणी असते. मात्र याच कोळंबीची एक मजेदार बाजू आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तुम्हाला माहितीये का कोळंबीचे हृदय तिच्या डोक्यात असते ? विश्वास बसत नाही ना किंवा यापूर्वी कधी ऐकलं नाही ना..मात्र हे खरं आहे. कोळंबीचे हृदय हे तिच्या डोक्यात असते. मात्र कोळंबीच्या अशा प्रकारच्या शरीर रचनेचे नेमके कारण काय आहे, चला जाणून घेऊयात.

कोळंबीचे हृदय तिच्या डोक्यात का असते?

अर्थातच याचे कारण जीवशास्त्रात येते. तेलंगणा टुडेच्या मते, कोळंबीचे हृदय हे तिचे पोट तसेच इतर महत्वाच्या अवयवांसह तिच्या डोक्याच्या आत असते. तुम्ही कोळंबी साफ करताना कधी जवळून पाहिलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की कोळंबीच्या डोक्याच्या, तोंडाच्या बाजूचा आकार जाड आणि कठीण भाग आहे. हा भाग अनेक पापुद्र्यांनी संरक्षण केलेला, झाकलेला असतो. ज्याला एक्सोस्केलेटन म्हणून ओळखले जाते. हे एक्सोस्केलेटन कोळंबीच्या अंतर्गत अवयवांचे नुकसान होण्यापासून संरक्षण करते. यामुळेच कोळंबीचे महत्त्वाचे अवयव डोक्यात असतात. त्यामध्ये हृदयाचाही समावेश आहे. डोक्याचा भाग हा सुरक्षित असल्याने कोळंबीचे हृदय हे तिच्या डोक्यात असते.


एवढंच नाही तर कोळंबीच्या हृदयाच्या तीन जोड्या आहेत. जिथे रक्त आत आणि बाहेर येते, संपूर्ण शरीरात फिरते. पाण्याखाली ऑक्सिजनयुक्त राहण्यासाठी तशी रचना कोळंबीच्या शरीरात असते. यातून असं लक्षात येतं की एवढीशी लहान कोळंबी मात्र तिच्या शरिराची रचना किती गुंतागुंतीची आहे.

कोळंबीच्या रक्ताचा रंग

कोळंबी हा शब्द लॅटिन आणि ग्रीक भाषेतून आला आहे आणि त्याचा मूळ अर्थ समुद्री खेकडा असा होतो. कोळंबीचा आकार लहान असतो आणि त्यांची लांबी साधारणतः ३ सेंटीमीटर असते, त्यापेक्षा जास्त नसते. कोळंबीमध्ये असलेले काही अवयव पुढीलप्रमाणे, रंध्र, गोनाड, हृदय, हेपॅटोपॅनक्रियास (पचन ग्रंथी, राखीव पदार्थांच्या साठवणीसाठी काम करतात), पोट, गुद्द्वार आणि तोंड. आणखी एक गोष्ट तुम्हाला माहिती नसेल ती म्हणजे कोळंबीच्या रक्ताचा रंग निळा असतो. जे एक श्वसन रंगद्रव्य आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.