Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

योग्य पद्धतीने दही खाल्यास शरिराला होतात आयुर्वेदक फायदे, जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

योग्य पद्धतीने दही खाल्यास शरिराला होतात आयुर्वेदक फायदे, जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला 


कडक उन्हात शरीर थंड राहण्यासाठी आपण अनेक पदार्थ खातो.उन्हाळ्यात सार्वधिक खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे दही. अनेकदा आपण दही नुसतेच खातो. पण त्यामुळे शरीराला फारसा उपयोग होत नाही. पण दह्यात इतर पदार्थ मिक्स करून प्यायल्याने शरीराला आयुर्वेदिक फायदे होतात. दही खाल्ल्याने शरीराला नेमके काय फायदे होतात जाणून घेऊया सविस्तर..

राज्यभरात सगळीकडे कडक ऊन पडत आहे. कडाक्याच्या उन्हात बाहेर जाणून आल्यानंतर शरीराला थंडाव्याची आवश्यकता असते.उष्णता वाढल्यामुळे आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवतात. उन्हाळ्यात घराबाहेर जाणून आल्यानंतर काहींना काही थंड खाण्याची किंवा पिण्याची इच्छा होते. तेव्हा आपण ताक, दही, सरबत, लस्सी इत्यादी थंड पेय पितो.उष्णतेपासून वाचण्यासाठी दही मदत करते. दह्यामुळे शरीरातील उष्णता कमी होऊन शरीर थंड राहते. दह्याचे सेवन केल्याने शरीराला भरपूर फायदे होतात. दह्यात बॅक्टेरिया आणि प्रोबायोटिक्स मुबलक प्रमाणात आढळून येतात. तसेच यामध्ये फॉस्फरस, पोटॅशियम, व्हिटॅमिन ए, विटामिन बी 2 आणि विटामिन बी 12 चांगल्या प्रमाणात आढळते. त्यामुळे रोजच्या आहारात दह्याचे सेवन केले पाहिजे. पण काही लोक उन्हाळ्यात किंवा इतर ऋतूमध्ये दह्याचे सेवन नुसतेच करतात. पण यामुळे शरीराला जास्त फायदे होत नाही.

आयुर्वेद एक्सपर्ट डॉक्टर रोबिन शर्मा यांच्या मते 99 टक्के लोक दह्याचे सेवन नुसतेच करतात. त्यामुळे शरीराला जास्त फायदा होत नाही. पण दह्यामध्ये पाणी किंवा इतर काही पदार्थ टाकून खाल्ल्यास शरीराला अनेक फायदे होतात. शरीरातील ताकद योग्यरीत्या वाढवण्यासाठी दह्याचे योग्य प्रकारे सेवन करणे आवश्यक आहे. यावर डॉक्टर रोबिन शर्मा यांनी काही सल्ले दिले आहेत. चला तर जाणून घेऊया.डॉक्टरांनी सांगितल्यानुसार, दह्याचे योग्य प्रकारे सेवन केल्याने शरीराला आयुवेदिक फायदे होतात. कॅल्शियमने समृद्ध असलेल्या दह्यामुळे शरीरातील हाडे आणि दात मजबूत राहतात. यामध्ये विटामिन डी असल्याने शरीरात कॅल्शियमची कमतरता भासत नाही.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.