Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

प्रज्वल रेवन्ना जर्मनीहून बेगंळुरुला रवाना, विमानतळावर SIT सज्ज

प्रज्वल रेवन्ना जर्मनीहून बेगंळुरुला रवाना, विमानतळावर SIT सज्ज 


जनता दल (सेक्युलर)चे निलंबित खासदार प्रज्वल रेवन्ना यांनी गुरुवारी (दि.30) म्युनिक ते बेंगळुरूला परतीच्या विमानाचे तिकीट बुक केले आहे. अशी अधिकृत माहिती सूत्रांनी दिली आहे. रेवन्ना यांच्यावर लैंगिक छळाचे आणि त्याचे व्हिडीओ करुन प्रसिद्ध केल्याचे आरोप आहेत. तसेच विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेवन्ना 31 मे रोजी बेंगळुरूमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे.

विशेष तपास पथकाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेवन्ना बेंगळुरूला पोहोचताच त्याला अटक करण्यासाठी विशेष तपास पथकाचे अधिकारी केम्पेगौडा येथील विमानतळावर सतत लक्ष ठेवून आहेत. रेवन्ना यांच्यावर आतापर्यंत लैंगिक शोषणाचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
रेवन्ना यांनी दोन दिवसांपूर्वी एक व्हिडिओ पोस्ट केला होता. ज्यामध्ये त्यांनी 31 मे रोजी एसआयटीसमोर हजर राहून तपासात सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते. सूत्रांनी सांगितले की, रेवन्ना यांनी यापूर्वी दोनदा जर्मनीहून विमानाची तिकिटे रद्द केली आहेत. दरम्यान, एसआयटीने जिल्हा मुख्यालयात असलेल्या रेवन्ना यांच्या निवासस्थानाची झडती घेतली. जी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. “काही आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.

कर्नाटकच्या गृहमंत्र्यांनी सांगितले की, पेनड्राइव्हच्या वाटपप्रकरणी दोन लोकांना अटक केली आहे. या प्रकरणात जो कोणी सहभागी असेल मग तो कोणत्याही पक्षाचा असो, त्याला अटक केली जाईल. आतापर्यंत याप्रकरणी 11 ते 12 जणांना अटक करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.