Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

VI च्या प्रीपेड ग्राहकांसाठी गिफ्ट! लॉन्च केला VI Guarantee Program, 1 वर्षासाठी मिळणार तब्बल इतका डेटा

VI च्या प्रीपेड ग्राहकांसाठी गिफ्ट! लॉन्च केला VI Guarantee Program, 1 वर्षासाठी मिळणार तब्बल इतका डेटा 


वोडाफोन आयडीया (Vodafone Idea) ने आपला नवीन (Vi) गॅरंटी प्रोग्राम लॉन्च केला आहे. या प्रोग्राममध्ये कंपनी 130GB फ्री डेटा देत आहे. व्हीआय गॅरंटी प्रोग्राम ऑफर कंपनीच्या 5G अनेबल किंवा नवीन 4G स्मार्टफोन वापरणाऱ्या ग्राहकांसाठी आहे. युजर्सना प्रोग्राममध्ये 130 GB डेटा फ्रीमध्ये मिळेल. केवळ प्रीपेड युजर्सच या प्लानचा लाभ घेऊ शकतील. व्हीआय गॅरंटी प्रोग्रामचे इतर फायदे आणि अटींबद्दल माहिती जाणून घेवूया…

व्हीआय गॅरंटी प्रोग्राम म्हणजे काय?

कंपनीने नवीन युजर्ससाठी गॅरंटी प्रोग्राम आणला आहे. ज्यामध्ये कंपनी 13 महिन्यांसाठी 130GB फ्री डेटा देत आहे. ग्राहकांना दर महिन्याच्या 28 तारखेला 10GB डेटा मिळेल. जो 13 महिन्यापर्यंत देण्यात येईल. म्हणजेच तुम्हाला दर महिन्याला 10 GB डेटा मिळेल, जो 13 महिने देण्यात येत राहील. अतिरिक्त 10GB मोबाइल डेटा तेव्हाच वापरला जाऊ शकतो जेव्हा विद्यमान प्लॅनचा डेटा संपला असेल.

व्हीआय गॅरंटी प्रोग्रामचा लाभ कोण घेऊ शकतो?
या ऑफरचा लाभ घेण्यासाठी युजर अनलिमिटेड डेली डेटा पॅक असलेला प्रीपेड ग्राहक असणे आवश्यक आहे. त्याची किंमत 239 रुपये ते 3,199 रुपये आहे. म्हणजेच ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे आधीपासून 239 रुपयांपेक्षा अधिक किमतीचा प्लॅन असणे आवश्यक आहे. व्हीआय गॅरंटी प्रोग्राममध्ये उपलब्ध असलेल्या डेटामुळे या प्लॅनसह दरमहा अतिरिक्त 10 GB डेटाचा लाभ मिळेल.
व्हीआय गॅरंटी प्रोगॅम या राज्यांमध्ये उपलब्ध नाही

जर युजर्स गॅरंटी प्रोग्रॅमदरम्यान प्रीपेडवरून पोस्टपेडवर स्विच करतो किंवा त्यांचा नंबर डिॲक्टिव्हेट करतो तर त्यांना उर्वरित फायद्यांचा लाभ घेता येणार नाही. याशिवाय युजर्सकडे 5G किंवा नवीन 4G स्मार्टफोन असणे देखील आवश्यक आहे. ही ऑफर कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, आसाम, उत्तर पूर्व आणि ओडिसाच्या टेलिकॉम सर्कलमध्ये उपलब्ध असणार नाही. ही ऑफर 25 मे ते 14 जून पर्यंत वैध असणार आहे.

व्हीआय गॅरंटी प्रोग्राम ऑफर कशी क्लेम करायची?
युजर्सनी प्रथम ते व्होडाफोन आयडिया नेटवर्कवर आहेत आणि ते 4G किंवा 5G स्मार्टफोन वापरत आहेत याची खात्री करावी लागेल. 
जर युजर्स कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, आसाम, उत्तर पूर्व आणि ओडिसा येथील टेलिकॉम सर्कमधील असतील तर ही ऑफर काम करणार नाही.
योग्य युजर्स त्यांच्या स्मार्टफोनवर 121199 किंवा 199199# डायल करू शकतात.
USSD कोड आल्यावर ऑफरवर क्लेम करण्यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
सर्व स्टेप्स फॉलो केल्यानंतर तुम्हाला एक कन्फर्मेशनचा मेसेज मिळेल.
युजर्स *199# डायल करून अतिरिक्त डेटा देखील चेक करु शकतात.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.