Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आता पाण्याच्या टाकीत उतरण्याची गरज नाही, 10 रुपयांत टाकीतला गाळ करा गायब

आता पाण्याच्या टाकीत उतरण्याची गरज नाही, 10 रुपयांत टाकीतला गाळ करा गायब 


मुंबई पुण्यासह महाराष्ट्र्रात आता पावसाळा सुरु झाला आहे. पावसाळ्याची मज्जा अनुभवायची असेल तर आधी घरी- दारी आवश्यक तरतूद करून ठेवावी लागते. गावाकडे पावसाळा सुरु होण्याआधी घरावर ताडपत्री घालण्यासाठी विशेष एक दिवस राखीव ठेवला जायचा. पाण्याची भांडी स्वच्छ करून ठेवणे, कपडे वाळत घालण्यासाठी घरातच रश्यांची सोय करून ठेवणे अशी सगळी कामं एकदा का मार्गी लागली की मग छान पाऊस, चहा, भज्या असा कॉम्बो एन्जॉय करायला मोकळीक मिळायची. सुदैवाने शहरांकडे एवढा खटाटोप करावा लागत नाही, पण एक काम मात्र दर पावसाळ्यात करावं लागतं ते म्हणजे पाण्याची टाकी स्वच्छ करणे. पावसाळ्यात अनेकदा धरणांमध्ये चिखल उसळला जात असल्याने आपल्या घरी येणारे पाणी पण थोडे गढूळ असू शकते. या मातीचा थर जर सतत टाकीत साचत राहिला तर कधी कधी पाण्याला कुबट वास येऊ शकतो. पावसाचा जोर वाढण्याआधी आपण आज टाकीत न उतरता सहज मातीचा किंवा गाळाचा थर कसा दूर करायचा याची हॅक पाहणार आहोत.

आज आपण पाहणार आहोत ती ट्रिक इतकी सोपी आहे की आपण दर दीड-दोन आठवड्यांनी हा उपाय करून टाकी सहज स्वच्छ करू शकता. यासाठी आपल्याला थोडी लांब काठी किंवा रॉड लागणार आहे. इन्स्टाग्रामवर @prajakta_salve या अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. यामध्ये जुगाड करताना लोखंडाचा रॉड वापरलेला आहे पण आपण साधी घरी कपडे सुकत घालायला ठेवलेली काठी सुद्धा वापरू शकता. या काठीच्या एका टोकाला आपल्याला तारेची घासणी रबर बँडच्या मदतीने बांधून घ्यायची आहे. घासणी शक्यतो नवीन असावी जेणेकरून घासणीचेच लहान तुकडे टाकीत पडणार नाहीत व टाकी नीट स्वच्छ होईल. ही घासणी साधारण १० ते १५ रुपयांना सहज मिळते त्यामुळे तुम्हाला वेगळा खर्च करायची गरज नाही. टाकी पूर्णच रिकामी असेल तर तुम्ही त्यात डिटर्जंट टाकूनही घासून घेऊ शकता.
दरम्यान, याच अकाउंटवरून यापूर्वी पाणी भरलेल्या टाकीतील गाळ कसा स्वच्छ करावा याची सुद्धा माहिती दिली होती. आपण प्लास्टिकची बॉटल अर्धी कापून त्याला साधा पीवीसी पाईप व रबरने जोडायचं असतं, बॉटलचा मागचा भाग टाकीच्या आत टाकून पाईप जमिनीवर सोडून द्यायचा आहे व मग आपोआपच टाकीच्या तळातील गाळ थोड्या थोड्या पाण्यासह निघून बाहेर येताना दिसेल. हा जुगाड सुद्धा आपण करून पाहू शकता.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.