Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बायकोला नेहमी तेच हवं, वैतागला नवरा :, डॉक्टरही उपचार करून थकले

बायकोला नेहमी तेच हवं, वैतागला नवरा :, डॉक्टरही उपचार करून थकले 


नवी दिल्ली : प्रत्येकाला काही ना काही सवय असते, काही ना काही आवडी असतात. अशीच एक महिला जिला इतकी विचित्र सवय होती की त्याबाबत समजताच तिच्या नवऱ्यालाही धक्का बसला. तिची ती सवय सोडवण्यासाठी तिला त्याने डॉक्टरांकडे नेलं.

पण डॉक्टरही उपचार करून थकले.

पॅट्रीस बेन्जामिन रामगुलाम असं या महिलेचं नाव आहे. 39 वर्षांची महिला, तिला भिंतीचं प्लास्टर काढून ते खायला आवडतं. हे तिच्या शरीरासाठी चांगलं नाही हे तिला माहिती आहे पण तरी ती स्वतःला खाण्यापासून रोखू शकत नाही. भिंतीच्या प्लास्टरमागे काय आहे हे जाणून घेण्यासाठी वयाच्या 15 व्या वर्षी त्यांनी पहिल्यांदाच भिंतीचं प्लास्टर तोडून काढलं. यावेळी थोडं तिनं खाल्लं. तिला ते आवडलं आणि ती पुन्हा पुन्हा ते खाऊ लागली.

लग्नानंतरही सुटली नाही सवय
पॅट्रिसने तिच्या एका शालेय मित्राला डेट केलं आणि त्याच्याशी लग्न केलं. ती भिंतीवरून सिमेंट काढून खाते हे तिनं आपल्या पतीपासून लपवलं. एके दिवशी पतीनं तिला ते खाताना पाहिलं आणि त्याला धक्काच बसला. त्याने पॅट्रिसला ही सवय सोडण्यास सांगितलं पण त्याचा तिच्यावर काहीही परिणाम झाला नाही. शेवटी त्याने तिला डॉक्टरांकडे नेलं.
डॉक्टरांच्या उपचारानंतरही परिणाम नाही

डॉक्टरांच्या मते, या स्थितीला पिका म्हणतात. ज्यामध्ये लोक खाण्यासाठी नसलेल्या गोष्टी खायला लागतात. डॉक्टरांनी पॅट्रिसवर उपचार केले पण तेसुद्धा तिचीही सवय सोडवू शकले नाहीत.

अमेरिकेतही भिंत खाणारी महिला
दरम्यान अमेरिकेच्या मिशिगनमध्येही राहणारी एक महिलाही भिंत खाते. निकोल असं तिचं नाव. एका टिव्ही प्रोग्राममध्ये तिनं आपल्या या सवयीबद्दल सांगितलं तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटलं. ती म्हणाली, आपल्या आईच्या मृत्यूनंतर ती डिप्रेशनमध्ये गेली. यानंतर तिला खडू खाण्याची सवय लागली. हळूहळू तिला भिंतींचा वास आवडू लागला. यानंतर ती भिंतीही खाऊ लागली. निकोलने सांगितलं की तिला वेगवेगळ्या भिंतींची चव आवडते.

निकोलच्या म्हणण्यानुसार, आपल्या या सवयीमुळे ती स्वतःच वैतागली आहे. एका आठवड्यात ती तीन फूट भिंत खाते. यामुळे तिच्या घराच्या भिंतीला अनेक बोगदे आहेत. आसपासच्या लोकांच्या घराच्याही भिंती ती खाते निकोलच्या या सवयीला आसपासचे लोकही वैतागले आहेत.

निकोलला एक मुलगाही आहे. डॉक्टरांनी तिला असं न करण्याचा इशाराही दिला आहे. मात्र तिला भिंत खाण्याची इतकी जास्त सवय आहे की ती याकडे दुर्लक्ष करते. डॉक्टरांनी तिला सांगितलं आहे की या सवयीमुळे तिच्या आतड्यांनाही मोठं नुकसान पोहोचू शकतं. ही सवय न सोडल्यास तिच्यासाठी हे जीवघेणंही ठरू शकतं, असंही डॉक्टरांनी तिला सांगितलं आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.