Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सोनाक्षी सिन्हा प्रेग्नेंट? लग्नाच्या 5 दिवसातच झहिरसोबत पोहचली रुग्णालयात

सोनाक्षी सिन्हा प्रेग्नेंट? लग्नाच्या 5 दिवसातच झहिरसोबत पोहचली रुग्णालयात 


मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिनं नुकतंच लग्न केलं. बॉयफ्रेंड झहीर इकबालबरोबर कोर्ट मॅरेज करत सोनाक्षीनं आयुष्याची नवीन सुरुवात केली. दरम्यान लग्नाच्या 5 दिवसात सोनाक्षी आणि झहीर हॉस्पिटलमध्ये स्पॉट झालेत.
मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयात सोनाक्षी आणि झहीर इकबाल यांना स्पॉट करण्यात आलं. हॉस्पिटलमधून बाहेर पडतानाचा त्यांचा व्हिडीओ समोर आला आहे. लग्नाच्या काही दिवसात दोघे हॉस्पिटलला का पोहोचले असा प्रश्न अनेकांनी पडला आहे. काहींनी सोनाक्षी प्रेग्नंट असल्याचा अंदाज लावला आहे. पण हॉस्पिटलला जाण्याचं नेमकं कारण समोर आलेलं नाही.
सोनाक्षी आणि झहीर इकबाल यांनी 23 जून रोजी मुंबईत कोर्ट मॅरेज केलं. सोनाक्षीनं मुस्लिम मुलाशी लग्न केल्यानं तिच्यावर प्रचंड टीका करण्यात आली. पण आई-वडिलांच्या सहमतीनं तिनं कोर्ट मॅरेज करत नात्याला नाव दिलं. सोनाक्षी लग्नानंतर धर्म बदलणार असंही म्हटलं गेलं. पण सोनाक्षी धर्म बदलणार नाही असं तिच्या सासऱ्यांनी स्पष्ट केलं. हे लग्न दोन मनांचं आहे. त्यात धर्माचा काही संबंध नाही असं त्यांनी सांगितलं. सोनाक्षी लग्नानंतर खूप खुश होती. रिसेप्शन पार्टीमध्ये तिनं नवऱ्याबरोबर कल्ला केला.
लग्नाच्या पाचव्या दिवशीच सोनाक्षी आणि झहीरला हॉस्पिटलमध्ये पाहून अनेकांना धक्का बसला आहे. दोघेही कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये स्पॉट झाले. दोघेही कारमधून बाहेर गेले. सोनाक्षीचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी कमेंट्स करत अनेक तर्क लावले आहेत. एका युझरनं लिहिलंय, ठबाळं येतंय?ठ दुसऱ्या युझरनं लिहिलंयस, ठमेडिकल टेस्ट? ती प्रेग्नंट आहे का?ठ तर आणखी एका युझरनं लिहिलंय, ठआलिया आणि रणबीर यांनीही लग्नाच्या काही दिवसात गुड न्यूज दिली होती.

सोनाक्षी आणि झहीर हे एकमेकांना 7 वर्षांपासून डेट करत होते. 2022मध्ये दोघांनी गुपचूप साखरपुडा देखील उरकला होता. दोघांनी त्यांचं रिलेशन खूप सिक्रेट ठेवलं होतं. पण जसं जसं लग्नाचे दिवस जवळ येऊ लागले तसे दोघे सातत्यानं एकत्र दिसू लागले. ज्यावरुन दोघांच्या नात्याच्या चर्चा रंगू लागल्या. अखेर दोघांनी 23 जून कोर्ट मॅरेज केलं. असंही म्हटलं जातंय की सोनाक्षी आणि झहीर 7 वर्ष कुटुंबाच्या संमतीसाठी थांबवले होते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.