Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

उत्तर प्रदेशात भाजप का हरली? समोर आलं धक्कादायक कारण

उत्तर प्रदेशात भाजप का हरली? समोर आलं धक्कादायक कारण 


नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला उत्तर प्रदेशात  दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं. भाजपला उत्तर प्रदेशात कमीत कमी ६० जागा तरी जिंकण्याची अपेक्षा होती, मात्र राम मंदिर बांधूनही आणि विकासाचे राजकारण करूनही भाजपला उत्तरप्रदेशात यश मिळालं नाही.
२०१९ च्या तुलनेत मोठ्या प्रमाणात भाजपच्या जागा घटल्या तर दुसरीकडे समाजवादी पार्टी आणि काँग्रेस आघाडीला मात्र मोठं यश मिळालं. जनतेने इंडिया आघाडीला भरगोस मतदान केलं. या पराभवानंतर भाजपने कारणीमासा शोधली. यामध्ये अनेक धक्कादायक कारणे समोर आली आहेत.
शुक्रवारी लखनऊमध्ये भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीत पक्षाचा पराभव झाला त्या जागांचे विश्लेषण करण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या अहवालात नोकरशाहीने जनतेशी आणि कामगारांना कशी वागणूक दिली आणि अधिकाऱ्यांच्या अंतर्गत हत्येचाही उल्लेख केला आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा आढावा घेणाऱ्या भाजपच्या विशेष पथकाने हा सविस्तर अहवाल प्रदेश नेतृत्वाला सादर केला आहे. पराभवाची अनेक कारणे या अहवालात देण्यात आली आहेत.
या रिपोर्टमध्ये असं म्हंटल आहे कि, विधानसभेतील आमदारांच्या निष्क्रियतेमुळे पक्षाचे नुकसान झालं आहे. अनेक आमदार त्यांच्या भागातील लोकसभा उमेदवारांच्या विरोधात होते आणि या वादातूनच पक्षाचे नुकसान झालं. विरोधकांनी संविधानाचा मुद्दा उचलून धरला होता, त्यामुळे अनुसूचित जाती, दलित आणि ओसीबी मतदान बिथरले आणि त्यांनी भाजपविरोधात मतदान केल्याचे रिपोर्ट म्हणून सांगण्यात आलं आहे. उत्तर प्रदेशातील जनता बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांवर आणि अधिकाऱ्यांवर नाराज होती, ती नाराजी इंडिया आघाडीच्या पथ्यावर पडली आणि भाजपला फटका बसला असं अहवालातून म्हंटल आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत उत्तरप्रदेशात 80 जागांपैकी समाजवादी पक्षाने सर्वाधिक 37 जागा जिंकल्या होत्या. तर भाजपला केवळ 33 जागा मिळाल्या. काँग्रेसला ६ जागा, आरएलडीला २, आझाद समाज पक्ष आणि अपना दल (एस) यांना प्रत्येकी एक जागा मिळाली. तर मायावतींच्या बसपाला खातेही उघडता आले नाही.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.