Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

गुटखा थुकंतांना गमावला प्राण! शरिराचे जागीच तुकडे :, घटनास्थळ पाहून अंगाचा थरकाप

गुटखा थुकंतांना गमावला प्राण! शरिराचे जागीच तुकडे :, घटनास्थळ पाहून अंगाचा थरकाप 


मध्य प्रदेशमधील एका विचित्र अपघातामध्ये एका व्यक्तीने प्राण गमावल्याची घटना समोर आली आहे. तोंडातील गुटखा थुंकण्यासाठी धावत्या गाडीमधून तोंड बाहेर काढणं एका ट्रॉली चालकाच्या जीवावर बेतलं आहे. मध्य प्रदेशमधील खारगावमध्ये हा प्रकार घडला आहे. धावत्या चारचाकी खिडकीमधून तोंडातील गुटखा थुंकण्यासाठी चालकाने मान बाहेर काढली. त्याचवेळी समोरच्या बाजूने येणाऱ्या वाहन हा चालक बसलेल्या वाहनाच्या एवढ्या जवळून गेलं की या व्यक्तीच्या डोक्याला वाहनाने जोरदार धडक दिली.

चालकाचा जागीच मृत्यू झाला; मुंडकं खाली पडलं
मध्य प्रदेशमध्ये झालेल्या या अपघातामधील धडक एवढी भयानक होती की चालकाचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. समोरुन येणारी गाडी एवढ्या वेगात हा चलक बसलेल्या बाजूच्या खिडकीला घासून गेली ती चालकाचं मुंडकं तुटून खाली रस्त्यावर पडलं. समोरचा हा सारा प्रकार पाहून प्रत्यक्षदर्शींच्या काळजाचा ठोका चुकला. मरण पावलेल्या व्यक्तीचं नाव आकाश मकासरे असं असून तो 22 वर्षांचा आहे. आकाश हा बरवाणी जिल्ह्यातील तलवारा धरण परिसरात वास्तव्यास होता. जोधपूरवरुन आणलेल्या भाज्यांची खेप घेऊन तो खारगावच्या दिशेने जात होता, तेव्हाच हा अपघात घडला. पोलिसांनी आकाशचा मृतदेह ताब्यात घेतला आहे.
दुर्घटनेनंतर धडक देणारा चालक घटनास्थळावरुन पळून गेला

समोर आलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर या वाहनाला धडक देणाऱ्या वाहनाचा चालक घटनास्थळावरुन पसार झाला. स्थानिकांनी पोलिसांनी घडलेल्या घटनेची माहिती दिली. धडक देणारा चालक जोधपूरच्या दिशेने पळून गेल्याचं प्रत्यक्षदर्शिंनी सांगितलं. पोलीस आता या चालकाचा सीसीटीव्हीच्या मदतीने शोध घेत आहेत. 

...म्हणून झाला अपघात
आकाशचा हात अपघात झालेल्या वाहनांपासून काही फूट दूर पडला होता. चालकाच्या मृतदेहापासून दूरवर त्याच्या अवयावचे तुकडे पडलेले पाहून लोकांचा थरकाप उडाला. त्यांनी तातडीने पोलिसांना फोन करुन या घटनेचा तपशील सांगितला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचे तुकडे ताब्यात घेतले. ज्या ठिकाणी हा अपघात झाला तिथे रस्त्याचं काम सुरु असल्याने एकाच मार्गावरुन दोन्ही बाजूची वाहतूक सुरु आहे. त्यामुळेच हा अपघात घडल्याचं सांगितलं जात आहे. पोलीस सध्या या घटनेची माहिती घेत असून जबाब त्यांनी नोंदवून घेतला आहे. आता सीसीटीव्हीच्या मदतीने आकाशच्या गाडीला धडक देणारी गाडी नेमकी कोणती होती? तिच्या नंबर प्लेटच्या मदतीने आरोपीचा शोध घेतला जात आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.