Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जागतिक बँकचे प्रतिनिधीनी महापालिका क्षेत्रातील पूर बाधित होणाऱ्या काही ठिकाणा दिल्या भेटी

जागतिक बँकचे प्रतिनिधीनी महापालिका  क्षेत्रातील पूर बाधित होणाऱ्या काही ठिकाणा दिल्या भेटी 


सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेस जागतिक बँकेच्या प्रतिनिधी भेट दिली आहे,  त्यावेळी जागतिक बँकेच्या प्रतिनिधी यांचे स्वागत करण्यात आले. मा आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या उपस्थितीत आज स्थायी समिती सभागृहात  मध्ये  जागतिक बँक श्री . अनुप कारंथ, वरिष्ठ आपत्ती जोखीम व्यवस्थापन विशेषज्ञ,श्री.सविनय ग्रोव्हर, वरिष्ठ वित्तीय व्यवस्थापन विशेषज्ञ, श्री.वरुण सिंग, वरिष्ठ सामाजिक विकास विशेषज्ञ,श्रीमती .नेहा व्यास, वरिष्ठ पर्यावरण तज्ज्ञ    सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील पूर बाधीत क्षेत्र आणि पावसाळी दिवसात साचून राहनारे पाणी रस्ते , तसेच श्यामराव नगर या भागातील पावसाळ्यात साचून राहणारे पाणी निचरा करण्यासाठी  उपाययोजना बाबत या वेळी चर्चा करण्यात आली आहे, 

या वेळी गुरव अँड कन्सल्टंट यांनी  स्ट्रम वॉटर मॅनेजमेंट बाबत प्रेझेस्टेशन दिले आहे,  सांगलीतील महापूर नियंत्रण करण्यासाठी महापालिकेने जागतिक बँकेच्या अर्थ साहाय्यासाठी आयुक्त शुभम गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली  शासनाकडे 476 कोटींचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाच्या अनुषंगाने आज जागतिक बँकेच्या पथकाने सांगलीतील महापूर बाधित अनेक ठिकाणांची पाहणी केली.
सदर पथकांनी सांगली शहरातील काही भागाना भेटी दिल्या आहेत, त्या मध्ये श्यामराव नगर , के टी बंधारा , आर्यनविन पूल , मंगलधाम   सांगलीत आज जागतिक बँकेच्या प्रतिनिधींच्या पथकाने सांगलीतील नियमित पाण्यात जाणाऱ्या ठिकाणची पाहणी केली. यामध्ये कुंभार मळा, शामराव नगर यासह कृष्णा नदीच्या आजूबाजूचा परिसर तसेच मारुती चौक  आदी परिसराची पाहणी केली. इत्यादी परिसरास भेटी दिल्या आहेत, या वेळी आपत्ती व्यवस्थापन केंद्रास भेटी वेळी चांगल्या प्रकारे  नियोजित केले आहे, असे आपत्ती व्यवस्थापन केंद्र अद्यावत केल्या बदल महापालिकेचे अभिनंदन केले आहे, 

या वेळी अति आयुक्त रविकांत अडसूळ , चंद्रकांत खोसे , शहर अभियंता  पृथ्वीराज चव्हाण, मुख्य लेखा परीक्षक शिरीष धनवे , डॉ रवींद्र ताटे, सहा आयुक्त आपत्ती व्यवस्थापन नकुल जकाते  जन संपर्क अधिकारी धनंजय हर्षद  , विशेष कार्यकारी अधिकारी सुनील पाटील   , अभियंता महेश मदने इत्यादी उपस्थित होते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.