Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली :- पत्नीच्या अं्नीतिक संबधाला कंटाळून पतीची आत्महत्या, पत्नीसह भोंदू महाराजावर गुन्हा दाखल

सांगली :- पत्नीच्या अं्नीतिक संबधाला कंटाळून पतीची आत्महत्या, पत्नीसह भोंदू महाराजावर गुन्हा दाखल 


कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ येथे घराच्या पंख्यास गळफास घेऊन सतीश रवींद्र चव्हाण (वय ३०, रा. विद्यानगर, कवठेमहांकाळ) या तरुणाने आत्महत्या केली. याप्रकरणी पत्नी व भोंदू महाराज या दोघांवर गुन्हा दाखल केला.
पत्नी शीतल सतीश चव्हाण (रा.विद्यानगर, कवठेमहांकाळ), तर भोंदू महाराज दिनेश माने (रा.पंढरपूर, जि.सोलापूर) असे या दोन संशयित आरोपींची नावे आहेत. याबाबत राजेंद्र रवींद्र चव्हाण (रा.चिंचवड, पुणे,मूळ गाव बेनापूर, ता.खानापूर) यांनी फिर्याद दाखल केली असून, कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत माहिती अशी की मंगळवारी दि १८ रोजी १०.३० वाजण्याच्या सुमारास सतीश चव्हाण याने राहते घरी पंख्यास गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ही आत्महत्या नसून सतीश यांची पत्नी शीतल हिची वरचेवर दातखिळी बसत असल्याने शीतलच्या माहेरचे लोक तिला उपचारासाठी भोंदू बाबामहाराज दिनेश माने यांच्याकडे पंढरपूर येथे घेऊन गेले होते. तेव्हापासून त्यांची एकमेकांची ओळख होऊन पुढे त्यांचे प्रेमसंबंध चालू झाले. 

त्यांना याबाबत समज देऊनही प्रेमसंबंध बंद करण्याबाबत सतीश यांनी दोघांनाही सांगितले होते. तरीही त्यांनी ऐकले नाही, त्यानंतर शीतल हिने पती सतीश यास घर नावावर करून दे असा तगादा लावत होती. तसेच दिनेश माने व शीतल यांच्या अनैतिक संबंधाला कंटाळून सतीश यास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचे मयत सतीश चव्हाण यांचा भाऊ राजेंद्र चव्हाण यांनी कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या दोघांवर कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, भोंदू महाराज दिनेश माने हा फरार झाला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक जोतिराम पाटील करीत आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.