Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

डॉक्टर पतीच्या त्रासाला कंटाळून डॉक्टर पत्नीची आत्महत्या

डॉक्टर पतीच्या त्रासाला कंटाळून डॉक्टर पत्नीची आत्महत्या 


सोलापूर : डॉक्टर पतीच्या त्रासाला कंटाळून डॉक्टर पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सांगोला येथे घडली आहे. या घटनेमुळे सांगोल्याच्या वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली. सांगोला पोलिसांनी डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.

याप्रकरणी पोलिस फरार डॉक्टराचा शोध घेत आहेत. संशयीत आरोपी डॉक्टर सुरज रुपनर यांच्या सोबत डॉक्टर ऋचा यांचे 2012 मध्ये लग्न झाले होते. त्यांना दोन लहान मुलं आहेत. लग्नानंतर डॉक्टर सुरज हा पत्नी ऋचाला वारंवार मानसिक आणि शारिरीक त्रास देवून पैशाची मागणी करत होता. सुरज त्यांना शिवीगाळ करून लाथाबुक्याने मारहाण करून शारीरिक मानसिक त्रास देत होता.

आरोपी डॉक्टर सुरज रूपनर हा एमआरआय मशीन विकत घेण्याकरीता माहेरून पैसे घेऊन ये नाहीतर आत्महत्या कर म्हणून सातत्याने ऋचा यांना त्रास देत होता. त्यांच्या त्रासाला कंटाळून डॉक्टर ऋचा रुपनर यांनी 6 जून रोजी सांगोला येथे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

सांगोला पोलिस स्टेशनमध्ये ऋचा यांचा भाऊ ऋषिकेश संजय पाटील यांनी तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनंतर डॉक्टर सुरज यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून आरोपी डॉक्टर सुरज रुपनर यांचा शोध सुरु आहे. आरोपीला अटक करून कडक शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी डॉक्टर ऋचा यांच्या नातेवाईकांनी केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.