Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महाराष्ट्र सदनला प्रचंड पाणी टंचाई,मंत्र्याचे हाल, पिण्याच्या पाण्याने अंघोळ करण्याची वेळ

महाराष्ट्र सदनला प्रचंड पाणी टंचाई,मंत्र्याचे हाल, पिण्याच्या पाण्याने अंघोळ करण्याची वेळ 


भारताची राजधानी असलेल्या दिल्लीला गेल्या काही दिवसांपासून पाणी टंचाईला सामोरं जावं लागत आहे. देशात अद्यापही मान्सून दाखल झालेला नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे.


या पाणी टंचाईवर आता चिंता व्यक्त केली जात आहे. असं असताना राजधानी दिल्लीतला एक अजबगजब प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्रातील मराठी नागरिकांसाठी दिल्लीत महाराष्ट्र सदन बांधण्यात आलं आहे. या महाराष्ट्र सदनमध्ये देशभरातील नागरीक येत असतात. ते महाराष्ट्र सदनला भेट देत असतात. महाराष्ट्रातीलही अनेक मंत्री, विविध क्षेत्रातील दिग्गज नेते महाराष्ट्र सदनला दिल्लीत गेल्यावर आवर्जून भेट देतात. महाराष्ट्रीत दिग्गज नेते अनेकदा कामानिमित्त महाराष्ट्र सदनला गेले तर तिथे मुक्कामाला देखील राहतात. अतिशय महत्त्वाच्या अशा महाराष्ट्र सदनला दिल्लीतील पाणी टंचाईचा फटका बसला आहे. महाराष्ट्र सदनला पाणी पुरवठा होत नसल्याने इथे असलेल्या मंत्र्यांना चक्क बाटलीबंद पाणीने अंघोळ करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
महाराष्ट्र सदनच्या नव्या इमारतीमधील शौचालयांमध्येदेखील पाण्याची व्यवस्था नाही. पाणी न आल्यामुळे अनेकांची इथे गैरसोय होत असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, आज बकरी ईद आहे. या बकरी ईदमुळे वरिष्ठ अधिकारी सुट्टीवर आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सदनला आलेल्या अतिथींची मोठी गैरसोय होत आहे. अनेकजण बाहेरुन पाणी मागवत आहेत.

महाराष्ट्र सदनमध्ये सध्या अनेक व्हीआयपी
महाराष्ट्र सदनच्या बांधकामासाठी इतके पैसे खर्च करण्यात आले आहे. असं असताना तिथे पाण्याचं नियोजन करण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचं बघायला मिळत आहे. दरम्यान, महाराष्ट्र सदनमध्ये सध्या अनेक व्हीआयपीदेखील आल्याची माहिती मिळत आहे. त्यांनादेखील बाहेरुन पाणी आणून दिल्याची माहिती मिळत आहे. पिण्याच्या पाण्याचा मशिनमध्येदेखील काहीच पाणी नाही.

महाराष्ट्र सदनमध्ये पाण्याचं नियोजन करणं गरजेचं होतं. कारण देशभरातीतून आणि महाराष्ट्रातील अतिथी वेगवेगळ्या कामानिमित्ताने महाराष्ट्र सदनमध्ये येत असतात. न्यायाधीश, मंत्री, आमदार, खासदार असे अनेक व्हीआयपी महाराष्ट्र सदवमध्ये येत असतात. त्यामुळे सदनाच्या अधिकाऱ्यांनी त्वरित यावर लक्ष घालून पाण्याचं नियोजन करावं, अशी मागणी अतिथींकडून केली जात आहे. ही मागणी आता कधी पूर्ण केली जाते, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.