Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

' उपसभापतीपद द्या, अन्यथा....':, विरोधकांनीं खेळला मोठा डाव

' उपसभापतीपद द्या, अन्यथा....':, विरोधकांनीं खेळला मोठा डाव 


18 व्या लोकसभेच्या स्थापनेनंतरचे पहिले अधिवेशन सुरु होणार आहे. लोकसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या शपथविधीनंतर 26 जून रोजी लोकसभा सभापतीची निवडणूक होणार आहे.

एनडीए पक्षांनी भाजप उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र, विरोधकांनी उपसभापतीपदाची मागणी केली आहे. सत्ताधारी पक्षाने उपसभापतीपद आमच्यासाठी सोडले नाही तर सभापतीपदासाठीही उमेदवार उभा करु शकतो, असे विरोधकांनी सांगितले. खरे तर संसदीय परंपरेनुसार उपसभापतीपद विरोधकांना दिले जाते. भाजपच्या नेतृत्वाखालील NDA पक्षांकडे लोकसभेत 293 जागा आहेत, तर इंडिया ब्लॉककडे 234 जागा आहेत.
लोकसभा उपसभापती पद पाच वर्षांपासून रिक्त

नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळात स्थापन झालेल्या सरकारमध्ये लोकसभेचे उपसभापतीपद रिक्त होते. 17 व्या लोकसभेत उपसभापतीपद रिक्त राहिले. ओम बिर्ला यांनी सभापती म्हणून काम पाहिले. यावेळी विरोधकांना असे घटनात्मक पद रिक्त राहू द्यायचे नाहीये. उपसभापतीसाठी निवडणूक व्हावी, असे विरोधकांचे म्हणणे आहे.

गेल्या दहा वर्षांपासून लोकसभेत विरोधी पक्षनेता नाही
लोकसभेचे उपसभापतीच नव्हे, तर लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदही गेल्या 10 वर्षांपासून रिक्त आहे. नियमानुसार, ज्या पक्षाने सभागृहात दहा टक्क्यांहून अधिक संख्याबळ मिळवले आहे आणि सभागृहातील प्रमुख विरोधी पक्ष आहे, त्या पक्षाकडून विरोधी पक्षनेता बनवला जातो. पण 2014 आणि 2019 मध्ये काँग्रेसकडे ती संख्या नव्हती. मात्र यावेळी विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसच्या खात्यात येऊ शकते. मात्र, अद्याप नावाची निवड झालेली नाही. राहुल गांधी यांना विरोधी पक्षनेते केले जाईल, असे मानले जात आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.