Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Whats App वरचे डिलिट केलेले मेसेज परत वाचायचे असतील तर 'ही ' ट्रिक वापरा

Whats App वरचे डिलिट केलेले मेसेज परत वाचायचे असतील तर  'ही ' ट्रिक वापरा 


व्हॉट्सअ‍ॅप हे जगभर वापरलं जाणारं इन्स्टंट मेसेजिंग ॲप आहे. करोना महामारीनंतर हे ॲप फक्त वैयक्तिक संपर्कापुरतं मर्यादित राहिलेलं नाही तर ऑफिस कामासाठीही त्याचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यास सुरुवात झाली आहे.

मेसेजेसच्या बरोबरीने फोटो आणि व्हिडिओही त्यावरुन शेअर केले जातात. व्हॉट्सअ‍ॅपकडून कॉलिंग आणि व्हिडिओ कॉलिंगची सुविधाही देण्यात आली आहे. अशा वेळी खरं तर प्रायव्हसी जपणं हे अत्यंत अवघड होऊन बसतं.

युझर्सची प्रायव्हसी अबाधित राहावी, यासाठी अनेक प्रायव्हसी बेस्ड फीचर्स दिली जातात. 'डिलीट फॉर एव्हरीवन' हे असंच एक फीचर आहे. एखादा मेसेज 'डिलीट फॉर एव्हरीवन' केल्यानंतर पाठवणारा आणि प्राप्त करणारा अशा दोघांच्याही फोनमधून तो मेसेज डिलीट होतो. मात्र, डिलीट केलेल्या मेसेजचा माग राहतो. पाठवलेला मेसेज डिलीट करण्यात आलाय हे इतरांच्या लक्षात येतं. अशा वेळी पाठवणाऱ्याने काय डिलीट केलं असेल या कुतूहलातून ते शोधण्याचा प्रयत्न युजर्स करतात.
डिलीट केलेले मेसेज काय होते हे शोधण्यासाठी काही थर्ड पार्टी ॲप्स वापरता येतात मात्र त्यांचा वापर करणं धोकादायक ठरु शकतं. त्यामुळेच अँड्रॉईड फोनमधील एका इनबिल्ट फीचरबद्दल तुम्हाला माहिती देणार आहोत. या फीचरच्या मदतीने डिलीट केलेले मेसेज तुम्ही वाचू शकता. या फीचरच्या मदतीने डिलीट केलेले फक्त मेसेजच वाचता येऊ शकतात. डिलीट केलेले फोटो बघता किंवा ऑडियो मेसेज ऐकता येणार नाहीत. हे फीचर अँड्रॉईड 11 आणि त्या पुढील व्हर्जन्समध्येच उपलब्ध आहे.

सगळ्यात आधी फोन सुरु करा आणि सेटिंग्जमध्ये जा. त्यानंतर नोटिफिकेशन्सचा पर्याय निवडा. त्यानंतर मोअर सेटिंग्जमध्ये जा आणि नोटिफिकेशन हिस्ट्रीवर क्लिक करा. आता स्क्रीनवरील टॉगल ऑन करा. हे फीचर सुरु केल्यानंतर नोटिफिकेशन हिस्ट्रीमध्ये जाऊन 24 तासांमध्ये डिलीट केलेले मेसेज वाचता येतील.
सध्या स्मार्टफोन वापरणाऱ्या प्रत्येकाची सगळी माहिती स्मार्टफोन आणि त्यातही व्हॉट्सअ‍ॅपवर असते. अशा वेळी आपल्या माहितीची गोपनीयता राखणं महत्त्वाचं ठरतं. सतत नवनवीन अपडेट्स आणून व्हॉट्सअ‍ॅपकडून आपल्या ग्राहकांच्या सुरक्षिततेची आणि गोपनीयतेची काळजी घेतली जात असतेच, मात्र युजर्सनीही थर्ड पार्टी ॲप्सचा वापर करण्यापूर्वी किंवा पिन, पासवर्ड शेअर करण्यापूर्वी काळजी घेणं आवश्यक आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.