Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

एकाच झाडाला 300 प्रकारचे आंबे, 'मँगो मॅन ऑफ इंडिया' यांच्या हाताची जादू.....

एकाच झाडाला 300 प्रकारचे आंबे, 'मँगो मॅन ऑफ इंडिया' यांच्या हाताची जादू.....


फळांचा राजा कोणाला नाही आवडत, उन्हाळ्याच्या हंगामात आंबे खाण्याची मजा काही औरच.परंतू तुम्ही कधी एकाच झाडाला 300 प्रकारचे आंबे लागलेले कधी पाहीलय का? हा चमत्कार केला आहे. उत्तर प्रदेशातील मलीहाबाद येथील रहिवासी असलेल्या कलीम उल्लाह खान यांनी हाताची ही जादू आहे की त्यांनी त्यांच्या बागेत या आंबाच्या झाडावर केलेल्या विविध प्रयोगाने तब्बल 300 प्रकारचे आंब्याची जाती तयार होतात.

केवळ सातव्या इयत्तेपर्यंत शिकलेल्या कलीम उल्लाह खान यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.उन्हातान्हात केलेल्या मेहनतीनंतर हे आंब्याचं झाड त्यांना बक्षिस म्हणून मिळाले आहे. वयाच्या 17 वर्षांपासून ते आंब्याची कलमे करण्याचे तंत्र शिकले.भारतात आंब्याच्या अनेक जाती आहेत.आपण तोतापुरी, लंगडा, दशहरी, फजली, चौसा, सफेदा आणि रतौल ही आंब्याच्या जातीची नाव ऐकली असतील. परंतू त्यांनी शोधलेल्या आंब्याचं नाव ‘ऐश्वर्या’ असे आहे. ऐश्वर्या राय बच्चन हीला साल 1994 मध्ये सिस वर्ल्ड म्हणून निवडल्यानंतर त्यांनी आनंदाने आपल्या आंब्याच्या जातीला ऐश्वर्या दिले आहे. त्यांच्याकडील आंब्याला त्यांनी अनारकली, सचिन तेंडुलकर आणि पीएम नरेंद्र मोदी अशी नावेही आंब्यांना दिली आहेत.

मँगो मॅन नावाने प्रसिद्ध

जगभरात मँगो मॅन ऑफ इंडिया नावाने ओळखले जाणारे कली उल्लाह यांनी सातवीनंतर शाळा सोडली.त्यांचे आंब्याचे झाड एक महाविद्यालय आहे.ज्यावर अनेक पीएचडी करु शकतील,ते म्हणतात या आंब्याच्या झाडाचा अभ्यास केल्यानंतर कॅन्सर, एचआयव्ही सारख्या आजारावर देखील औषध मिळेल.
कलीम उल्लाह खान यांचे अभ्यासात मन रमलं नाही, वयाच्या 17 वर्षी ते वडीलांसोबत नर्सरीत झाडांची निगा राखायला शिकले. ग्राफ्टीग तंत्राने त्यांनी याच वयात पहिले झाड कलम केले आहे.आंब्याचे पहिले झाड त्यांना याच वयात लावले होते, परंतू हे झाड जोरदार पावसाने जगले नाही.परंतू त्यांनी हार मानली नाही, आणि बागायतीमध्ये आपले नाव कमावले.

आंबे भारतातच नाही तर पाकिस्तान, फिलीपाईन्सचे देखील राष्ट्रीय फळ आहे. बांग्लादेशचा आंबा हा राष्ट्रीय वृक्ष आहे, भारत जगातील सर्वात मोठा आंबा उत्पादक देश आहे. येथे फळाच्या राजा आंब्यापासून अनेक डीशेस तयार केल्या जातात. उदाहरणार्थ मँगो चटणी, मँगो स्मूदी, मँगोकरी, मँगो जिलेबी, मँगो पुडींग, मँगो सलाड, मँगो लस्सी, मँगो मोजिटो, मँगो ज्यूस, आणि मँगो आइस्क्रीम आदी. केवळ स्वादासाठी नव्हे तर आम्हाला आरोग्यासाठी देखील चांगला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.