Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय! महिला IRS अधिकाऱ्याला दिली लिंग आणि नाव बदलण्याची परवानगी

केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय! महिला IRS अधिकाऱ्याला दिली लिंग आणि नाव बदलण्याची परवानगी 


एका वरिष्ठ महिला IRS अधिकाऱ्याला मोदी सरकारने त्यांच्या लिंग बदलला मान्यता दिली आहे. याशिवाय महिला आयआरएस अधिकाऱ्याला नवे नावही मिळाले आहे. भारतीय नागरी सेवांमध्ये असे प्रथमच घडले आहे. एक ऐतिहासिक निर्णय घेत अर्थ मंत्रालयाने सर्व अधिकृत कागदपत्रांमध्ये त्यांचे नाव आणि लिंग बदलण्याची विनंती मान्य केली आहे.

एम अनुसूया, हैदराबादमधील सीमाशुल्क उत्पादन आणि सेवा कर अपीलीय न्यायाधिकरण (CESTAT) च्या मुख्य आयुक्त कार्यालयात सह आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी लिंग आणि नाव बदलण्याची परवनगी मिळावी अशी विनंती केली होती. त्यांनी आता आपले नाव बदलून एम अनुकथिर सूर्य असे ठेवले आहे. 
सूर्या यांनी डिसेंबर 2013 मध्ये चेन्नईमध्ये सहाय्यक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला होता. यानंतर 2018 मध्ये त्यांना उपायुक्त करण्यात आले. गेल्या वर्षी त्या हैदराबादमध्ये सध्याच्या पोस्टिंगवर रुजू झाल्या. त्यांनी चेन्नईतील मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून इलेक्ट्रॉनिक्समध्ये पदवी पूर्ण केली. यानंतर त्यांनी २०२३ मध्ये भोपाळ येथील नॅशनल लॉ इन्स्टिट्यूट युनिव्हर्सिटीमधून सायबर लॉ आणि सायबर फॉरेन्सिक्समध्ये पीजी डिप्लोमा पूर्ण केला आहे.

लिंग बदल शस्त्रक्रिया करणे हे अत्यंत आव्हानात्मक आहे. त्यासाठी येणारा खर्चही लाखांत आहे आणि ही शस्त्रक्रिया करण्यापूर्वी मानसिक तयारी करावी लागते. या लिंग बदल शस्त्रक्रियेचे अनेक स्तर आहेत. ही प्रक्रिया दीर्घकाळ सुरू राहते. स्त्रीपासून पुरुषात रुपांतर होण्यासाठी सुमारे 32 प्रकारच्या प्रक्रियेतून जावे लागते. दुसरीकडे पुरुषापासून स्त्री होण्यासाठी 18 प्रकारच्या प्रक्रियेतून जावे लागते.
दरम्यान यासाठी कायदेशीर प्रक्रियेलाही समोरे जावे लागते. लिंग बदलण्यासाठी, प्रथम अर्ज करावा लागतो. त्यानंतर अर्जावर प्रक्रिया केली जाते. एकदा व्यक्तीने लिंग बदलण्याचा निर्णय घेतला की त्याला प्रतिज्ञापत्राचा मसुदा तयार करावा लागतो. या प्रतिज्ञापत्रात लिंग बदल घोषित करावा लागतो.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.