Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जतजवळ जीपचे टायर फुटून दोघेजण जागीच ठार

जतजवळ जीपचे टायर फुटून दोघेजण जागीच ठार 


जत-विजापूर गुहागर मार्गावरील जत शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या हवालदार वस्ती जवळ जीपचे टायर फुटून झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले. तर एक जण जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास घडली. 

मृतांमध्ये राजेंद्र आनंदराय बिराजदार (वय ३५, रा. उटगी) व दऱ्याप्पा संगप्पा बिराजदार( वय ३४, रा. जाडर बोबलाद) यांचा समावेश आहे. तर संजय हनुमंत कोळगिरी (रा. उटगी) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सांगली येथे उपचार सुरू आहेत. 

उटगी येथील हे तिघेही मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास कोल्हापूर येथे देवदर्शनासाठी जीप (एमएच ०४/ २१२१) मधून निघाले होते. जत - नागज रस्त्यावरून त्यांची जीप भरधाव वेगात जात असतानाच, गाडीचे टायर फुटल्याने ती झाडावर जाऊन आदळली. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे. रात्री अकराच्या सुमारास घडलेली घटना साडे बारा वाजण्याच्या आसपास एका वाहनधारकाला लक्षात आल्याने त्यांनी जत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन तिघांनाही बाहेर काढले. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. पहाटे दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी जत ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. यातील मृत राजेंद्र यांचे उटगी येथे कृषी दुकान आहे. तर अन्य दोघे शेती करतात. या घटनेने उटगी व जाडर बोबलाद परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.