Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

वाढत्या किमतीने निराश झालेल्या Air Tel नें आणले हे स्वस्त प्लॅन

वाढत्या किमतीने निराश झालेल्या Air Tel नें आणले हे स्वस्त प्लॅन 


३ जुलैपासून जियो आणि एरटेल च्या किमतीत वाढ झालेली दिसून येत आहे. यामुळे जियो तसेच एरटेल वापरणाऱ्या युजर्सना त्यांच्या आवडत्या प्लानसाठी आता आणखीन पैसे मोजावे लागणार आहे. यामुळे जियोचे आणि एरटेलचे ग्राहक जरा निराश झालेले दिसत आहेत. दिवसेंदिवस वस्तूंच्या वाढत्या किमतींनी लोकं हैराण झाले आहेत. तसेच मोबाईलमध्ये नेटपॅक असणेदेखील आता लोकांसाठी एक दैनंदिन गरज बनली आहे. पण ती गरज दिवसेंदिवस महाग होत आहे, त्यामुळे लोक मोठ्या प्रमाणात हताश आहते. त्यांची हि निराशा दूर करण्यासाठी एरटेलने एक मस्त बजेट प्लान आणला आहे.

जर तुम्हाला फक्त काही एका कामासाठी नेटपॅकची गरज आहे तर हा प्लान नक्कीच तुमच्यासाठी आहे, आणि तुम्ही या प्लानचा आस्वाद जरूर घेतला पाहिजे. एरटेलने असे दोन प्लॅन जारी केले आहेत. ज्यात पहिला प्लॅन २२ रुपयांचा असून दुसरा प्लॅन ३३ रुपयांचा आहे. दोन्ही प्लॅनमध्ये एका दिवसासाठी नेटपॅकची सुविधा मिळणार आहे. जर एखाद्याला महागले असणारे प्लॅन नकोय तर काम अनुसार या प्लानचा वापर जरूर करू शकता. हा प्लॅन काढून एरटेलने एक प्रकारे लोकांची निराशा दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.
२२ रुपयांचा एरटेल प्लॅन एरटेलचा सगळ्यात स्वस्त प्लॅन आहे, ज्यात युजरला १ जीबी डेटा दिला जाईल. इतकेच नव्हे दिला जाणारा डेटा हा सुपरफास्ट असण्याची हमी एरटेलने दिली आहे. एरटेलची ऑफर सध्या खूप व्हायरल असून युजर्समध्ये सध्या ट्रेन्डला देखील आहे. पुढे एरटेलचा दुसरा प्लॅन ३३ रुपयांचा आहे. जो २२ रुपयांच्या प्लॅन सारखाच असणार आहे पण यात ग्राहकाला २ जीबी डेटा देण्यात येणार आहे. याचा अर्थ ग्राहक त्याच्या गरजेनुसार प्लॅन खरेदी करू शकतो.

एरटेलच्या इतर प्लॅनच्या किमती काही प्रमाणात महागल्या आहेत. आता १७९ रुपयांच्या २८ दिवसाच्या प्लॅनसाठी १९९ रुपये मोजावे लागणार आहेत. तर ८४ दिवसांच्या प्लॅनसाठी ५०९ रुपये मोजावे लागणार आहेत, ज्याची किंमत पहिला ४५५ रुपये होती. एरटेलच्या वार्षिक प्लॅनची किंमत २०० रुपयांनी महागली असून ती १,९९९ अशी झाली आहे. या वाढत्या किमतीत एरटेलने २२ रुपये आणि ३३ रुपयांचे स्वस्त प्लॅन काढून ग्राहकांची निराशा दूर करण्याचा प्रयत्न केलं आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.