Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

लघवी करतांना जळजळ होते? दुर्लक्ष करू नका असू शकतो ' हा ' गंभीर आजार

लघवी करतांना जळजळ होते? दुर्लक्ष करू नका असू शकतो ' हा ' गंभीर आजार 


लघवीच्या माध्यमातून आपल्या शरीरातील टॉक्सिक घटक शरीराबाहेर टाकले जातात. त्यामुळे लघवी करताना काही समस्या आल्या तर त्याचा शरीरातील इतर अवयवांवरदेखील परिणाम होतो. युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (यूटीआय) ही लघवीशी संबंधित समस्या आहे.

पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना ही समस्या जास्त प्रमाणात जाणवते. यामागील कारण स्पष्ट झालेलं नसलं तरी अनेक संशोधनांमध्ये हे सिद्ध झालं आहे की, यूटीआयमुळे मूत्रमार्गात गंभीर संसर्ग होतो. हर्पीस व्हायरस किंवा फंगी बॅक्टेरियांमुळे ही समस्या होऊ शकते. यीस्टमुळे देखील यूटीआय होऊ शकतं. त्यावर वेळीच उपचार घेतले नाही तर किडनी आणि गर्भाशयात संसर्ग होऊ शकतो.

यूटीआयची समस्या कोणत्याही वयात जाणवू शकते. पण, लहान मुलांपेक्षा ज्येष्ठ नागरिकांमध्ये हे प्रमाण जास्त आहे. हा संसर्ग सात ते 15 दिवसांत बरा होतो. पण, जर तुम्हाला वारंवार या समस्येचा सामना करावा लागत असेल तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. जेणेकरून योग्य वेळी योग्य उपचार मिळतील.
यूटीआय इन्फेक्शनची लक्षणं

युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनमुळे लघवी करताना जळजळ होते. लघवीचा रंग गडद होतो आणि दुर्गंधी येते. लघवी येण्याचं प्रमाण अचानक वाढणं किंवा कमी होणं, ही देखील या इन्फेक्शनची लक्षणं आहेत. यूटीआय झालं असेल तर, महिलांना ओटीपोटात (पोटाच्या खालच्या भागात) तीव्र वेदना होऊ लागतात तर पुरुषांच्या रेक्टममध्ये वेदना होऊ शकतात. जर हा संसर्ग गंभीर स्वरुपात वाढला तर पाठदुखी, ताप, उलट्या आणि मळमळ इत्यादी तक्रारी जाणवू शकतात.

वारंवार यूटीआय इन्फेक्शन होण्याची कारणे
बॅक्टेरियामुळे यूटीआय होतं. म्हणूनच पर्सनल हायजिन महत्त्वाचं ठरतं. शरीराच्या स्वच्छतेची काळजी न घेतल्यास यूटीआय होण्याचा धोका दुपटीने वाढतो. मासिक पाळीत टॅम्पॉन्स किंवा सॅनिटरी पॅडचा चुकीचा वापर धोकादायक ठरू शकतो. यामुळे संसर्गाचा धोका वाढतो. याशिवाय डायबेटिस, गरोदरपणात अँटिबायोटिक्सचा अतिवापर, स्टोनची समस्या, पाण्याची कमतरता, कमकुवत प्रतिकारशक्ती यामुळेही यूटीआयची समस्या जाणवू शकते.

युरिनरी इन्फेक्शन टाळायचं असेल तर पर्सनल हायजिनची विशेष काळजी घेतली पाहिजे. सुती आणि हलके कपडे वापरले पाहिजेत. खूप घट्ट कपडे घालू नयेत. मासिक पाळीच्या काळात महिलांनी हायजिनची अधिक काळजी घेतली पाहिजे. याशिवाय, जास्त पाणी प्यायलं पाहिजे. मानवी शरीरासाठी पाणी खूप महत्त्वाचं आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे शरीरात अनेक प्रकारच्या समस्या सुरू होतात.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.