Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सोपं होणार पेट्रोल पंपाचं लायसन्स मिळवणं, केंद्रीय मंत्र्यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

सोपं होणार पेट्रोल पंपाचं लायसन्स मिळवणं, केंद्रीय मंत्र्यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा 


केंद्रीय मंत्री पीयूष गोयल  यांनी महिला उद्योजकांसाठी लायसन्स शुल्कात ८० टक्के आणि एमएसएमईसाठी शुल्कात ५० टक्के कपातीची घोषणा केली आहे. याशिवाय त्यांनी म्हटले की, भविष्यात सामान्य माणसासाठी पेट्रोल पंपचे लायसन्स मिळवणे सोपे होईल. केंद्रातील मोदी सरकार पेट्रोल पंपसंबंधी नियमात बदल करत आहे. यानंतर पेट्रोल पंप लोकवस्ती असलेल्या परिसरात ३०-५० मीटरच्या परिसरात चालवण्याची सुद्धा मंजूरी मिळेल.

कॉमर्स अँड इंडस्ट्री मिनिस्टर पीयूष गोयल यांनी लोकवस्ती असलेल्या परिसरात ३०-५० मीटरच्या परिसरात पेट्रोल पंप चालवण्यास मंजूरी देण्यासाठी पीईएसओला सुरक्षा उपायांची रूपरेषा तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. पीईएसओ सरकारच्या उद्योग संवर्धन आणि अंतर्गत व्यापार विभागांतर्गत काम करणारे एक कार्यालय आहे. ते स्फोटके कायदा, १८८४ आणि पेट्रोलियम कायदा, १९३४ अंतर्गत स्थापन नियामक रूपरेषेच्या अंमबजावणीत महत्वाची भूमिका बजावते.
पीयूष गोयल यांनी पीईएसओकडून देण्यात येत असलेल्या लायसन्स शुल्कात महिला उद्योजकांना ८० टक्के आणि एमएसएमईला ५० टक्के सवलत देण्याची घोषणा केली. गोयल यांनी पीईएसओच्या कामकाजात दक्षता वाढवण्यासाठी पेट्रोलियम, स्फोटके, फटाके आणि इतर संबंधीत उद्योगांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा केली. यावेळी त्यांनी या घोषणा केल्या.

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या एका वक्तव्यात म्हटले आहे की, गोयल यांनी पीईएसओला सुरक्षा उपायांचा आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे पेट्रोल पंप लोकवस्तीच्या परिसरात कमी अंतरावर सुद्धा चालवण्यास मंजुरी मिळेल.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.