Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सामाजिक सलोख्यासाठी राष्ट्रप्रेमी अभियान काळाची गरज : पोलीस निरीक्षक संजय मोरे.

सामाजिक सलोख्यासाठी राष्ट्रप्रेमी अभियान काळाची गरज : पोलीस निरीक्षक संजय मोरे.


सांगली  :- सामाजिक सलोखा, बंधुभाव वाढीसाठी चला! खरे राष्ट्रप्रेमी बनूया अभियान. लोकसहभाग व लोक पुढाकाराने राबविण्यात येत आहे. ही काळाची गरज आहे. असे मनोगत  सांगली शहर पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी व्यक्त केले. समाजामध्ये शांतता सुव्यवस्था राहण्याकरिता कायद्याचा सन्मान, सर्व धर्मियांचा आदर,पर्यावरणाची काळजी, महिलांचा आदर, व इतर जनहितार्थ मुद्दे घेऊन दिनांक 10 जुलै 2024 रोजी सायं. 5 वाजता, सांगली पोलीस स्टेशन भारती विद्यापीठ परिसर येथे प्रबोधन पर घोषवाक्य बॅनर मानवी साखळी अभिनव उपक्रमासंदर्भात, अभियानाची निमंत्रण पत्रिका पोलीस निरीक्षक मोरे यांना देण्यात आले. तरी राष्ट्रप्रेमी, शांतता प्रेमी नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले. याप्रसंगी ॲड. त्रिशाला पाटील, पै. प्रदीप उर्फ बंडू पाटील, अनमोल पाटील, तुषार वळीव,  प्रमोद माळी, शाहीन शेख, विनोद कदम, रमजान खलिफाउपस्थित होते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.