Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मोदी नंतर कोण होणार पंतप्रधान, जोतिषशास्त्र काय सांगतय?

मोदी नंतर कोण होणार पंतप्रधान, जोतिषशास्त्र काय सांगतय?


लोकसभा निवडणूक 2024 मध्ये मित्रपक्षांच्या मदतीने भाजपने पुन्हा एकदा आपले सरकार केंद्रात स्थापन केले आहे. मोदीजींच्या  नेतृत्वाखाली भाजप सलग तिसऱ्यांदा सत्तेत आले आहे. पण भाजपला  पाठिंबा देण्याऱ्या तसंच विरोधकांच्याही मनात प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे की, मोदीजींनंतर भाजपकडून पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असू शकतं? आज याविषयी आपण जोतिषशास्त्रानुसार सविस्तर जाणून घेऊयात. 

पंतप्रधानपदासाठी दोन नावांची सर्वाधिक चर्चा

भाजपच्या सध्याच्या ताकदवान नेत्यांमध्ये दोन नेत्यांची पंतप्रधानपदासाठी सर्वाधिक चर्चा आहे. एक म्हणजे नितीन गडकरी आणि दुसरे योगी आदित्यनाथ. नितीन गडकरी रस्ते वाहतूक आणि महामार्ग बांधण्याच्या बाबतीत अभूतपूर्व काम करत आहेत. भाजप सरकारवर टीका करणारेही गडकरींची स्तुती करायला मागेपुढे पाहत नाहीत. उत्तर प्रदेशसारख्या राज्यात पुन्हा भाजपचे मुख्यमंत्री झालेले योगी आदित्यनाथ हेही नेहमी हिंदुत्व जपताना दिसतात. 

नितीन गडकरी पंतप्रधान बनण्याची मोठी शक्यता
नितीन गडकरी यांचा जून 27 मे 1957 रोजी नागपूर येथे झाला. राजकारणासारख्या जगात त्यांची प्रतिमा स्वच्छ आहे. ते पंतप्रधान होण्याचीही मोठी शक्यता आहे. हे सत्य दुर्लक्षित करता येत नाही. ज्योतिषशास्त्रात या योगास फलदायी होण्यासाठी परिस्थितीवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे वेळेचे संयोजन खूप महत्त्वाचे आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार गडकरींच्या गुरूमध्ये सध्या राहूची अंतरदशा सुरू आहे. प्राचीन काळात राजे महाराजांच्या डोक्यावर असलेल्या छत्रासाठीही राहूला जबाबदार ठरवले जाते. त्यामुळे राहुचा मनोभाव चांगला असेल तर कोणालाही राजा बनता येते. गडकरींच्या कुंडलीत राहु बाराव्या घरात तूळ राशीत बसला आहे. तूळ राशीचा स्वामी शुक्र आपल्याच राशीमध्ये चढत्या स्थानापासून सातव्या घरात बसला आहे आणि दशमेश स्वामी सूर्यासोबतही आहे. त्यामुळे राहू शुक्रानुसार परिणाम देईल. इतर अनेक गोष्टी पाहता, मे 2025 ते ऑगस्ट 2026 या काळात गडकरी पंतप्रधान बनू शकतात. जर याकाळात ते पंतप्रधान झाले नाहीत तर भविष्यात शक्यता नाही.
योगी आदित्यनाथ यांचेही आहेत पंतप्रधान बनण्याचे योग

योगी आदित्यनाथ यांचा जन्म 29 डिसेंबर 1971 रोजी उत्तराखंडमधील पौडी जिल्ह्यातील पंचूर गावात झाला. कर्क राशीत त्यांच्या कुंडलीत नववा स्वामी, सप्तम स्वामी आणि आरोही स्वामी यांच्या संबंधामुळे राजयोग तयार झाला आहे. बृहस्पति आणि चंद्रामुळेही गजकेसरी योग तयार होतो. केंद्र कोनात शुभ ग्रह आणि सहाव्या एकादश घरात पाप ग्रहाच्या स्थानामुळे ही कुंडली मजबूत आहे. हे आयुष्यात योग्य वेळी घडणाऱ्या योग्य गोष्टी दाखवते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.