Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

गूळ आणि पाण्याचं ' असे ' करा सेवन, शरीर आतून होईल साफ :, रक्तही होईल शुद्ध!

गूळ आणि पाण्याचं ' असे ' करा सेवन, शरीर आतून होईल साफ :, रक्तही होईल शुद्ध!


गूळाचा वापर अनेकजण साखरेला पर्याय म्हणून करतात. काही लोक गूळाचा चहा पितात तर काही लोक गूळाचा वेगवेगळ्या पदार्थांमध्ये समावेश करतात. आयुर्वेदात गूळाचा एक औषधी म्हणूनही वापर केला जातो. गूळातून शरीराला अनेक आवश्यक मिनरल्सही मिळतात. जर तुम्ही गूळाचं सेवन पाण्यासोबत आणि तिळासोबत केलं तर तुम्हाला अनेक फायदे मिळतील.

गूळ आणि पाणी पिणं हा एक जुना आयुर्वेदिक उपाय आहे. गूळाचं पाणी सकाळी रिकाम्या पोटी प्याल तर शरीराला नॅचरल एनर्जी मिळते. ज्यामुळे अनेक आजारांपासून बचाव होतो. गूळाचे पोषक तत्व - कॅल्शियम, फॉस्फोरस, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, आयरन आणि लोह व झिंक तसेच तांबे यात असतं. व्हिटॅमिनमध्ये फोलिक अॅसिड आणि बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन असतात.

पचनतंत्र साफ होतं
गूळात असलेल्या नॅचरल तत्वांमुळे पचनतंत्र साफ होण्यास मदत मिळते. याने पोटासंबंधी वेगवेगळ्या समस्या जसे की, बद्धकोष्ठता, अॅसिडिटी आणि गॅसची समस्या दूर होते.
शरीर डिटॉक्स होतं - एनर्जी मिळते

गूळ आणि पाणी मिक्स करून प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. लिव्हर या पाण्याने हेल्दी राहतं आणि रक्तही शुद्ध होतं. गूळामध्ये अनेक नैसर्गिक तत्व असतात. याचं पाणी रिकाम्या पोटी प्यायल्याने दिवसभर शरीराला एनर्जी मिळते. थकवाही दूर होतो.

मेटाबॉलिज्म बूस्ट - इन्फेक्शनपासून बचाव
गूळ आणि पाण्याचं सेवन केल्याने मेटाबॉलिज्म बूस्ट होतं. ज्यामुळे तुम्हाला वजन कमी करण्यास, चरबी कमी करण्यास मदत मिळते. तसेच गूळामधील अॅंटी-ऑक्सिडेंट आणि मिनरल्सने इम्यून सिस्टीम मजबूत होतं. ज्यामुळे शरीराचा इन्फेक्शनपासून बचाव होतो.
कसं तयार कराल गूळ पाणी?

एक ग्लास कोमट पाणी घ्या. त्यात एक तुकडा गूळ टाकून चांगल्या प्रकारे मिश्रित करा. हे हेल्दी ड्रिंक सकाळी रिकाम्या पोटी प्यावं. काही महिने याचं सेवन केलं तर तुमचं पोटंही कमी झालेलं दिसेल आणि शरीराला इतर फायदेही होतील. जर तुम्हाला गूळ पाण्यात टाकून प्यायचा नसेल तर तुम्ही गूळ असाच खावा आणि मग पाणी प्यावे.

गूळ आणि तिळ सोबत खाण्याचे फायदे
गूळ आणि तिळ सोबत खाण्याचेही शरीराला अनेक फायदे मिळतात. गूळ आणि तिळ सोबत खाल्ल्याने यातील पोषक तत्व दुप्पट होतात. अशात याचे काय फायदे होतात हे जाणून घेऊ. तिळातील पोषक तत्व - तिळामध्ये कॉपर, मॅगनीज, कॅल्शियम, फॉस्फोरस, मॅग्नीशिअम, लोह, झिंक, मोलिब्डेनम, व्हिटॅमिन बी 1, सेलेनियम आणि डायट्री फायबर सारखे पोषक तत्व असतात.
ब्लड शुगर कंट्रोल 

ब्लड शुगर कंट्रोल करण्यास या दोन्ही गोष्टी फार मदत करतात. सोबतच याने तुमची हाडेही मजबूत होतात. त्याशिवाय तुमच्या त्वचेचं आरोग्यही चांगलं होतं. तुम्ही तिळ आणि गूळापासून तयार एक लाडू रोज खावा. शरीर व्हायरल इन्फेक्शनच्या जाळ्यात येणार नाही.

मेटाबॉलिज्म मजबूत होतं
या दोन्ही गोष्टी सोबत खाल्ल्याने तुमचं मेटाबॉलिज्म मजबूत होतं. हे पोटासाठीही चांगलं असतं. हिवाळ्यात याने सुरक्षा मिळते. कारण दोन्ही गोष्टी उष्ण आहेत. एनीमियाच्या रूग्णांनी जर आवर्जून याचा डाएटमध्ये समावेश करायला हवा. याने दोन्ही गोष्टींमुळे तुमच्या तणावही दूर होतो. तिळामुळे तुमच्या शरीराचा एलर्जीपासूनही बचाव होतो. तसेच हे हृदयासाठीही फायदेशीर आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.