Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ठाणे :-कुत्र्यासोबत संभोग, अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल

ठाणे :-कुत्र्यासोबत संभोग, अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल 


भटक्या कुत्र्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार  आणि त्याला मारहाण केल्याबद्दल एका अज्ञात व्यक्तीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, भारतीय न्याय संहितेत (BNS) प्राण्यांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी कोणत्या कलमाद्वारे गुन्हा दाखल करायचा याचा स्पष्ट उल्लेख नाही.
ठाणे शहरातील एका स्थानिक गृहनिर्माण संस्थेमध्ये 27 जून रोजी रात्री 11:30 वाजता ही घटना घडली. प्राणीमित्र संघटनेसोबत काम करणाऱ्या एका जोडप्याने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला. या प्रकरणात अद्याप कोणाला अटक झाल्याचे वृत्त नाही. पोलिसांनी घटनेची नोंद घेऊन गुन्हा दाखल केल्याचे समजते. प्राप्त माहितीनुसार, पीडित प्राणी कुत्री होती.

कुत्र्यावर शौचालयात अत्याचार

भटक्या कुत्र्यांना खाऊ घालणारी एक महिला आणि तिचा पती नेहमीप्रमाणे घराबाहेर पडले. कुत्र्यांना खाऊ घालण्यासाठी ते हाऊसिंग सोसाटीत गेले पण त्यांना ती कुत्री आढळली नाही. अलिकडेच या कुत्रीने पाच पिल्लांना जन्म दिला होता. त्यामुळे हे दाम्पत्य तिला काहीसा अधिक खाऊ देत असे. ती जागेवर न आढळल्याने या दाम्पत्याने शोध घ्यायला सुरुवात केली. दरम्यान रस्त्यावरुन जाणाऱ्या एका व्यक्तीने माहिती दिली की, जवळच्या स्वच्छतागृहातून कुत्र्याचा विव्हळतानाचा आवज येत आहे. दाम्पत्य लगबगीने त्या ठिकाणी गेले असता एक व्यक्ती शौचालयातून लगबगीने बाहेर पडला. तसेच, ही कुत्रीही तिथे आढळली.

कुत्र्याच्या गुप्तांगातून रक्तस्त्राव
दरम्यान, या दाम्पत्याने कुत्र्याला तपासले असता त्याच्या प्रायव्हेट पार्टमधून मोठ्या प्रमाणावर रस्तस्त्राव होत होता. त्यांनी तिला तातडीने पशुवैद्यकाकडे उपचारासाठी नेले. नंतर, या जोडप्याच्या लक्षात आले की, शौचालयातून बाहेर पडलेल्या व्यक्तीने कुत्र्यासोबत अनैसर्गिक संभोग  केला होता. त्यानंतर त्यांनी जवळच्या पोलीस स्टेशनमधये जाऊन तक्रार दिली. पोलिसांनी प्राप्त तक्रारीवरुन भारतीय दंड संहिता (IPC) चे कलम 377 आणि प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्याच्या 1960 च्या संबंधित कलमांचा वापर करुनत गुन्हा दाखल केला आहे.

एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने नमूद केले की देशभरामध्ये 1 जुलैपासून भारतीय न्याय संहिता (BNS) लागू झाली आहे. त्यामुळे या संहितेत अशा प्रकारच्या (प्राण्यांवरील लैंगिक अत्याचार) गुन्ह्याची तरतूदच नाही. परिणामी अशा बाबतीत पोलिसांकडे तक्रार अर्ज करु नका. प्राणी अधिकार कार्यकर्त्यांनी चिंता व्यक्त केली आहे की, बीएनएसमध्ये आयपीसीच्या कलम 377 प्रमाणेच तरतुदी नाहीत, ज्यामध्ये अनैसर्गिक लैंगिक संबंध आणि प्राण्यांवरील क्रूरतेसाठी शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे अशा प्रकारची तक्रार आली तर गुन्हा कोणत्या कलमाखाली दाखल करायचा असा प्रश्न पोलिसांसमोर उपस्थित झाला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.