Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

लाडकी बहीण योजनेसाठी दाखला आणायला गेला, तरुणाला सरपंचानें लगावली कानशीलात

लाडकी बहीण योजनेसाठी दाखला आणायला गेला, तरुणा ला सरपंचानें लगावली कानशीलात 


गोंदिया : महाराष्ट्र शासनाने राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केलीय. लाडकी बहीण योजनेंतर्गत राज्यातील गरीब कुटुंबातील महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपये दिले जाणार आहेत. हे पैसे थेट लाभार्थी महिलांच्या खात्यावर पाठवले जातील. या योजनेसाठी काही कागदपत्रांची पूर्तता करणं आवश्यक आहे. यासाठीच बहिणीचा दाखला आणायला गेलेल्या तरुणाला सरपंच महिलेने कानशिलात लगावल्याची घटना समोर आली आहे. ग्रामपंचायतीत तरुण दाखला आणायला गेला होता. सरपंच महिलेविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, महाराष्ट्र शासनाने राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केलीय. या योजनेसाठी दाखले, कागदपत्र गोळा करण्यासाठी धावपळ करीत आहेत. त्यातच तालुक्यातील नवेगावबांध ग्रामपंचायत कार्यालयात जन्माचा दाखला मागण्यासाठी गेलेल्या युवकाच्या कानशिलात महिला सरपंचाने हाणल्याची घटना घडली. मारहाण करणाऱ्या नवेगावबांध ग्रामपंचायतच्या महिला सरपंचाचे नाव हिराबाई नीलमचंद पंधरे असे आहे.
आशिष सुभाष लंजे वय 20 हा युवक दाखला मागण्यासाठी गेला होता. त्याला पैशाचा हिशोब न दिल्याचे कारण पुढे करुन सरपंच हिराबाई पंधरे यांनी युवकाच्या कानशिलात हाणली. आशीष लंजे हा नवेगावबांध येथील रहिवाशी आहे. नवेगावबांध येथील ग्रामपंचायत वन समितीच्यावतीने राष्ट्रीय उद्यानाच्या हिलटॉप गार्डनवरती काम पाहत होता. येणाऱ्या जाणाऱ्या पर्यटकांकडून प्रवेश पास देऊन पैसे गोळा करण्याचे कार्य करीत होता.

काही दिवसाआधी आशिष लंजे याला कामावरून काढण्यात आले होते. सरपंच हिराबाई पंधरे यांना आशिष लंजे यांनी पैशाचा हिशोब न दिल्यामुळे कानशिलात लगावल्याचे पोलीस स्टेशनला कबूल केले. सदर युवकाने सरपंच सौ.हिराबाई पंधरे यांच्या विरोधात पोलीस स्टेशन नवेगावबांध येथे तक्रार नोंदवली असून (BNS) भारतीय न्याय सेवे अंतर्गत 115(2) अंतर्गत एन.सी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास नवेगाव बांध पोलीस करीत आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.