Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

देवा असली मुलं कोणाला देऊ नको...! पोटच्या गोळ्यानेच फसवून घर विकलं :, उतारवयात त्या जोडप्यावर आली अशी वेळ

देवा असली मुलं कोणाला देऊ नको...! पोटच्या गोळ्यानेच फसवून घर विकलं :, उतारवयात त्या जोडप्यावर आली अशी वेळ 


म्हातारपणी माणसांना काठीची नव्हे तर आधारासाठी आपल्या माणसांच्या हाताची गरज असते. बहुतांश जण वृद्धापकाळात आपल्या आई-वडिलांची सेवा प्रेमाने करतात, त्यांना हव-नको ते बघतात. पण काही वेळा मुलं आई-वडिलांच्या कष्टांचे पांग असे काही फेडतात की ते पाहून डोळ्यात पाणीच येईल.

अशी एक घटना नागपूरमध्येही घडली ती वाचाल तर म्हणाल असा मुलगा नको गं बाई ! उतारवयातील आई-वडिलांची काळजी घेण्याऐवजी एका मुलाने त्यांना फसवून त्यांचं घर आणि संपत्ती विकून टाकली आणि त्यामुळे त्या वृद्ध दांपत्याला वृद्धाश्रमात राहण्याची वेळ आली. नागपूरमध्ये हा खळबळजनक प्रकार घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अभिजीत निपाणे या मुलाविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
आरोपी अभिजीत निपाणे याने मौजा गोरेवाडा येथील दोन प्लॉट प्रत्येकी ६० लाख रुपयांना विकले. याशिवाय झिंगाबाई टाकळी परिसरातील कुटुंबाच्या घरावरही त्यांनी बेकायदेशीर कब्जा केल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

छोट्या मुलाच्या घरी गेले होते वृद्ध दांपत्य 
मिळालेल्या माहितीनुसार, मीना निपाणे (70) आणि मुरलीधर असे पीडित दांपत्याचे नाव आहे. मीना या आरोग्य विभागातील निवृ्त्त अधिकारी आहे. कोविड-19 च्या काळात ते दोघेही गोवा येथे आपल्या छोट्या मुलाच्या, अनिकेतच्या घरी गेले होते. मात्र त्यांच्या अनुपस्थितीचा गैरफायदा घेऊन त्यांचा मोठा मुलगा अभिजीतने इतर लोकांसोबत फसवणूक करून निपाणे यांची मालमत्ता विकली, असे त्यांनी सांगितले.

12 मार्च 2024 रोजी निपाणे दांपत्य नागपूरला परत आले, मात्र तेव्हा अभिजीतने त्याच्या वृद्ध आई-वडिलांना स्वतःच्या घरात प्रवेश करू देण्यास नकार दिला. अभिजीतने केवळ त्यांची मालमत्ताच विकली नाही तर बनावट आधार कार्डसह कायदेशीर कागदपत्रेही बनवली होती हेही तेव्हा उघड झाले. यामुळे त्या दोघांनाही जबर धक्का बसला. अखेर त्यांना वृद्धाश्रमात राहण्याचा मार्ग पत्करावा लागला.

या प्रकरणी वृद्ध दाम्पत्याने मानकापूर पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. यानंतर अभिजीत आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांतर्गत फसवणुकीसह गुन्हा दाखल करण्यात आला असू न पोलिस पुढील तपास करत आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.