Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

लग्नाला दोनच महिने झाले, बायको निघाली बेवडी, रोज टिंग होऊन नवऱ्यालाही करते.....

लग्नाला दोनच महिने झाले, बायको निघाली बेवडी, रोज टिंग होऊन नवऱ्यालाही करते.....


आगरा : गेल्या काही दिवसांमध्ये पत्नी पत्नीच्या भांडणाच्या विविध घटना समोर येत आहे. यामुळे हत्या, आत्महत्या, तसेच लैंगिक अत्याचाराच्याही घटना समोर येत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नी स्वत: दारू पिते आणि पतीलाही बळजबरीने दारू पाजते, असा आरोप पतीने केला आहे. तसेच पत्नीच्या या सर्व प्रकाराला कंटाळून पतीने आपल्या दारुड्या पत्नीला माहेरी आणून सोडले.

आग्रा येथील पोलीस लाइन समुपदेशन केंद्रात हे प्रकरण समोर आल्यानंतर समुपदेशकांनाही धक्का बसला. याठिकाणी दोन्ही पती-पत्नीचे समुपदेशन झाले, तेव्हा दोघांनी एकमेकांची तक्रार केली. पतीने आरोप केला आहे, पत्नी दररोज दारू पिते आणि त्यालाही बळजबरीने पाजते. मी दारू पिऊ शकत नाही. मात्र, तरीसुद्धा पत्नी बळजबरी करते. पत्नी एकावेळी तीन ते चार पॅक पिते. तर पतीला दारू अजिबात पसंत नाही. दरम्यान, दुसरीकडे पत्नीने हे सर्व आरोप स्विकारले आहेत. तसेच समुपदेशनादरम्यान पत्नी म्हणाली की, पती विनाकारण पंडित बनत आहे.

रविवारी आयोजित कुटूंब समुपदेशन केंद्रात या प्रकरणाची सुनावणी झाली. सिकंदरा येथे राहणाऱ्या तरुणीने आरोप केला आहे की, तिच्या पत्नीने तिला मारहाण करत घरातून हाकलून लावले. आता ती माहेरी राहते. यानंतर पतीला राजस्थान येथे समुपदेशनासाठी बोलवण्यात आले.
पतीने सांगितले की, दोन महिन्यांपूर्वी त्याचे लग्न झाले होते. पहिल्याच वेळी तिने दारू पिण्याबाबत सांगितले. यानंतर ती दररोज दारू पिऊ लागली आणि बळजबरीने त्यालाही पाजू लागली. पत्नीच्या या भयंकर वागण्याने तो त्रासला होता आणि शेवटी नाइलाजाने तिला माहेरी सोडून आला.

आता पुढे काय होणार - 
समुपदेशनादरम्यान, पत्नीने स्पष्टीकरण देताना सांगितले की, तिला दारू पिण्याची सवय आहे. तसेच तिला तीन-चार पॅकने काहीच होत नाही. पती विनाकारण पंडित बनत आहे आणि मुद्दाम हा मुद्दा बनवत आहे. आता दोघांनाही पुढील तारखेला पुन्हा बोलावण्यात आले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.