Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दोन पत्नी आणि दोनपेक्षा जास्त अपत्ये असणाऱ्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देऊ नका :, विश्वहिंदू परीषदेची मागणी

दोन पत्नी आणि दोनपेक्षा जास्त अपत्ये असणाऱ्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देऊ नका :, विश्वहिंदू  परीषदेची मागणी 


राज्याचे अर्थमंत्री अजित पवार  यांनी अर्थसंकल्पात महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना  सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना महिन्याला 1500 रुपये देण्यात येणार आहेत. दरम्यान या योजनेवरुन राज्याच्या राजकारणात अनेक दावे-प्रतिदावे केले जात असताना या योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात मनसेचे नेते प्रकाश महाजन  यांच्या पाठोपाठ आता विश्व हिंदू परिषदने  देखील नवी मागणी केली आहे. ज्यांना दोन पत्नी आणि दोनपेक्षा जास्त अपत्ये आहेत त्यांना 'लाडकी बहीण योजनेचा लाभ देऊ नये, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेचे मुंबई-गोवा प्रदेश प्रमुख गोविंद शेंडे यांनी केली आहे. नागपुरात ते शनिवारी माध्यम प्रतिनिधींशी बोलत असताना त्यांनी ही मागणी केली आहे.


लोकसंख्या नियंत्रित करायची असेल तर या योजनेत बदल करा

या संदर्भात भाष्य करताना गोविंद शेंडे म्हणाले की, महिलांना या योजनेचा लाभ होणार असला तरी लोकसंख्येवर नियंत्रण ठेवायचे असेल तर सरकारने या योजनेवर बंधन घालणे आवश्यक आहे. काही समाजाचे लोक ज्यांना दोन पत्नी आहेत, तसेच 6 मुले आहेत, त्यांना जास्त फायदा होईल आणि ज्याची एक पत्नी आहे, एक मूल आहे त्याला कमी फायदा होईल. त्यामुळे सरकारने काही अटींचा या योजनेत समावेश केला पाहिजे. असे केल्याने केवळ खऱ्या लाभार्थ्यांना फायदा होऊ शकेल. अशी विश्व हिंदू परिषदेची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. हा राष्ट्रहिताचा विषय आहे. यात धार्मिक भावना आणू नये. लोकसंख्या नियंत्रित करायची असेल सरकारने या योजनेत बदल करण्याची गरज आहे. याबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांनाही पत्र लिहिणार आहोत, असेही गोविंद शेंडे यांनी बोलताना सांगितले.

घरबसल्या मोबाईलवर 'असा' भरा अर्ज

गुगलच्या प्ले स्टोअरवरून 'नारीशक्ती दूत' ॲप डाऊनलोड करा.
'नारीशक्ती दूत' ॲप ओपन करा.
तुमचा मोबाईल नंबर, ओटीपी आणि टर्म्स अँड कंडिशनवर क्लिक करून लॉगिन करा.
तुमचे पूर्ण नाव, ईमेल आयडी, जिल्हा, तालुका आणि नारीशक्तीचा प्रकार म्हणजे सर्वसामान्य महिला, बचत गट अध्यक्ष, गृहिणी, ग्रामसेवक या गोष्टी भरून प्रोफाईल अपडेट करा.
नारीशक्ती दूत या पर्यायावर क्लिक करून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा पर्याय निवडा.
अॅप्लीकेशनला लोकेशनची परमिशन द्या.
तुमच्यासमोर लाडकी बहीण योजनेचा फॉर्म येईल.
आधार कार्डवरील संपूर्ण नाव, जन्मतारीख, पतीचे किंवा वडिलांचे नाव, तुमचा गाव, तालुका, जिल्हा, पिन कोड, आधार कार्ड क्रमांक आणि तुम्ही इतर शासनाच्या योजनेचा लाभ घेत असाल तर त्याची सविस्तर माहिती भरा.
तुम्ही शासनाच्या इतर योजनेचा लाभ घेत नसाल तर नाही या पर्यायावर क्लिक करा.
वैवाहिक स्थिती काय आहे त्याबाबत माहिती टाका.
लग्नाआधीचे संपूर्ण नाव नमूद करा.
तुमचा जन्म परप्रांतात झाला असेल हो निवडा. आणि जर महाराष्ट्रात झाला असेल तर नाही या पर्यायावर क्लिक करा.
आता बँकेचा तपशील तुम्हाला भरायचा आहे. त्यात अकाउंट नंबर, बँकेचे नाव, आयएफसी क्रमांक, आधार कार्ड बँक खात्याला लिंक आहे की नाही याची सविस्तर माहिती भरा.
त्यांनतर तुम्हाला काही कागदपत्रे अपलोड करावे लागणार आहेत.
त्यात आधार कार्ड, अधिवास प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला, उत्पन्न प्रमाणपत्र किंवा पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड, अर्जदाराच्या हमीपत्र, बँक पासबुक, आणि महिलेचा जन्म जर पर प्रांतामध्ये झाला असेल तर त्याचा दाखला हे सर्व कागदपत्रे तुम्हाला अपलोड करायची आहे. हमी पत्राचा अर्ज तुम्हाला या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक दिली जाईल. त्यावर क्लिक करून तुम्ही हमीपत्र डाऊनलोड करू शकता. त्याची प्रिंट काढून तुम्हाला ते हमीपत्र फॉर्म भरायचे आहे.

सर्व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुम्हाला खाली अर्जदाराच्या फोटोचा ऑप्शन आला असेल.
या ठिकाणी कोणताही फोटो अपलोड करायचा नाही. तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या कॅमेऱ्याने अर्जदार महिलेचा लाईव्ह फोटो काढून अपलोड करायचा आहे.

फोटो काढून अपलोड झाल्यावर तुम्हाला खाली "Accept हमीपत्र डिस्क्लेमर" यावर क्लिक करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला या योजनेसाठी अटी आणि शर्ती काय आहे याची माहिती आली असेल. आता तुम्हाला ते एक्सेप्ट करायचे आहे.

त्यानंतर तुम्ही अपलोड केलेली कागदपत्रे पुन्हा एकदा चेक करून घ्या. त्यानंतर खाली तुम्हाला सबमिट फॉर्म या बटन वरती क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला एक ओटीपी येईल तो ओटीपी टाका.
या पद्धतीने तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म घरबसल्या मोबाईलवर भरू शकता.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.