Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

धक्कादायक! मध्यरात्री दुकान उघडून चहा, सिगारेट देण्यास महिलेचा नकार :, नामांकित डॉक्टरची महिलेला विवस्त्र करून मारहाण

धक्कादायक! मध्यरात्री दुकान उघडून चहा, सिगारेट देण्यास महिलेचा नकार :, नामांकित डॉक्टरची महिलेला विवस्त्र करून मारहाण 


बुलढाणा : अवघ्या महाराष्ट्राला  हादरवणारी घटना बुलढाण्यात  घडली आहे. बुलढाण्यात छोटसं किराणा दुकान चालवणाऱ्या महिलेकडे जात मध्यरात्री तीन वाजता एका डॉक्टरानं सिगारेट आणि चहाची मागणी केली. पण आता खूप उशीर झाला आहे, तुम्ही सकाळी या, असं उत्तर महिलेनं दिल्यानं डॉक्टरला राग अनावर झाला. याच रागातून डॉक्टरनं महिलेला मारहाण केली आहे. सर्वात धक्कादायक आणि संतापजनक बाब म्हणजे, या डॉक्टरनं महिलेला निर्वस्त्र करून मारहाण केल्याची माहिती मिळत आहे. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली आहे. 

बुलढाण्यातली जळगाव जमोद तालुक्यात राहणारी एक महिला किराणा मालाचं एक छोटंसं दुकान चालवते. महिलेचं दुकान घराला लागूनच आहे. अशातच मध्यरात्री तीन वाजता एका डॉक्टरनं महिलेच्या दुकानाचा दरवाजा ठोठावला. महिलेनं दार उघडलं. त्यावेळी डॉक्टरनं महिलेकडे एक सिगारेट आणि चहाची मागणी केली. मात्र, महिलेनं डॉक्टरला स्पष्ट नकार दिला. आता फार उशीर झाला आहे, तुम्ही उद्या या, असं महिलेनं स्पष्ट सांगितलं. पण महिलेनं दिलेल्या नकारानं डॉक्टरला राग अनावर झाला. त्यानं महिलेला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. महिलेचे कपडे फाडले आणि तिला निर्वस्त्र देखील केलं. 

गोविंद वानखेडे असं महिलेला निर्वस्त्र करुन मारहाण करणाऱ्या नराधम डॉक्टरचं नाव आहे. ही धक्कादायक घटना बुलढाण्यातली जळगाव जामोद येथे घडली आहे. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली आहे. सध्या महिलेला खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. 
महिलेच्या अंगावरील संपूर्ण वस्त्र फाडून या महिलेला विवस्त्र करण्याची धक्कादायक घटना जळगाव जामोद शहरात घडली आहे. डॉ.गोविंद वानखेडे याचे जळगाव जामोद शहरात वानखेडे हॉस्पिटल नावानं प्रख्यात हॉस्पिटल आहे. पोलिसांनी नराधम डॉ. गोविंद वानखेडेवर कलम 376/2024 , 74,75,76,,296,324(1),333,352,351(2),351(3),3(5) भारतीय न्याय संहितेनुसार गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहे. पण, आरोपी डॉक्टर फरार झाल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांकडून फरार डॉक्टरचा शोध सुरू आहे.

नेमकं काय घडलं? 
बुलढाण्यात एका डॉक्टरनं मध्यरात्री तीन वाजता एक छोटंसं किराणा मालाचं दुकान गाठलं. त्यानं दार ठोठावलं. एका महिलेनं दार उघडलं. त्यानंतर डॉक्टरनं महिलेकडे एक सिगारेट आणि चहा देण्याची मागणी केली. पण महिलेनं डॉक्टरला स्पष्ट नकार देत. तुम्ही उद्या सकाळी या, आता फार उशीर झाला आहे, असं उत्तर देत, दरवाजा लावू लागली. पण संतापलेल्या डॉक्टरनं महिलेला अडवलं आणि तिला विवस्त्र करत जबर मारहाण केली. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.