Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अनेकांना जीवनदान दिलं पण..., सोलापूर येथील महिला डॉक्टरनं संपवल जीवन

अनेकांना जीवनदान दिलं पण..., सोलापूर येथील महिला डॉक्टरनं संपवल जीवन 


सोलापूर : सोलापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात मोहोळ येथे एका महिला डॉक्टरने औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. ही घटना पेनूर गावातील आहे. जयश्री प्रशांत गवळी असं आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरचं नाव आहे. डॉक्टर जयश्री गवळी यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

स्त्रीरोग तज्ञ म्हणून जयश्री गवळी या पेनुर येथे काम करत होत्या. शुक्रवारी दुपारी डॉक्टर जयश्री गवळी बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्या. यानंतर त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालय आल्यानंतर त्यांना इथे मृत घोषित केले गेलं. पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

गेल्या दहा-बारा वर्षांपासून पेनुर येथे गवळी दाम्पत्याचं हॉस्पिटल आहे. जयश्री गवळी यांची पेनुर भागातील स्त्रीरोग तज्ञ म्हणून ओळख होती. डॉक्टर जयश्री यांना पती दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. या घटनेनं त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. आत्महत्येचं कारण मात्र अद्याप समोर आलं नाही.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.