Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मुकेश अंबानी यांच्या घराचे वीज बिल किती? 'या ' आकड्यावर तुमचा विश्वास बसणार नाही

मुकेश अंबानी यांच्या घराचे वीज बिल किती? 'या ' आकड्यावर तुमचा विश्वास बसणार नाही 


अशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि भारताचे मोठे उद्योजक, रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी आहेत. त्यांच्या अँटालिया हे जगातील महागड्या घरांपैकी एक आहे. अंबानी यांच्या या आलिशान घरात सर्व जागतिक सुविधांच रेलचेल आहेत.

या 27 मजल्यांच्या इमारतीत 50 आसनी थिएटर, 9 मोठ्या लिफ्ट, स्विमिंग पूल, 3 हेलीपॅड आणि 160 वाहनांसाठी वाहनतळ आहे. ही इमारत वातानुकूलित आहे. या आलिशान बंगल्याच्या देखरेखीसाठी जवळपास 600 अधिक कर्मचारी आहे.

वीज बिलात वाढीची शक्यता

या इमारतीत बगिच्याच्या माळीपासून ते स्वयंपाकी, इलेक्ट्रिशियनसह इतर अनेक कर्मचारी आहेत. त्यामुळे अँटालियाला हाय टेन्शन कनेक्शन देण्यात आले आहे. या इमारतीत इलेक्ट्रिशियन आणि वीज व्यवस्थापन करणारे कर्मचाऱ्यांना या इमारतीच्या वीज बिलात वाढ होण्याची भीती सतावत आहे. एका वृत्तानुसार, मुंबईतील सात हजार मध्यमवर्गीयांच्या घरात जितका विजेचा वापर होतो, तितका मुकेश अंबानी यांच्या या आलिशान घरासाठी जितका वीजेचा वापर करण्यात येतो.

किती युनिट वीज वापरली जाते
रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या अँटालिया चे एका महिन्यात जवळपास 6,37,240 युनिट वीज खर्च होते. या इमारतीतील सर्व खोल्या आधुनिक सुविधा युक्त आहेत. एका खोलीचा सर्वसाधारण वीज वापर जवळपास 300 युनिट इतका आहे. मुंबईतील 7000 मध्यमवर्ग कुटुंबांना जितकी विद्युत लागते, तितक्या वीजेचा वापर अँटालियासाठी करण्यात येतो.

6,37,240 युनिट वीज वापरासाठी अंबानी यांना जवळपास 70 लाख रुपयांचे बिल येते. वीज बिल जमा करण्यासाठी विद्युत विभागाने त्यांना 48,354 रुपयांची सूट पण दिली होती. अँटालियामध्ये एलिवेटेड पार्किंग आणि महागडी एअर कंडिशनिंगची व्यवस्था आहे. त्यामुळे वीजेचा अधिक वापर होतो.
6 वर्षांत बांधकाम

जगातील सर्वात महागडे घर बांधण्याच्या कामास 2004 मध्ये सुरुवात झाली होती. या 27 मजली आलिशान बंगल्याचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी सहा वर्षांचा कालावधी लागला. ही इमारत 2010 मध्ये तयार झाली होती. Antlia इमारत एखाद्या राजवाड्यापेक्षा कमी नाही. ही इमारत 4 लाख चौरस फुटावर आहे. एका वृत्तानुसार ही इमारत तयार करण्यासाठी 15000 कोटी रुपयांचा खर्च आला. या इमारतीत सेव्हन, फाईव्ह स्टार हॉटेल सारख्या सुविधा आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.