Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आइस्क्रीममध्ये बोट निघाल्यानंतर आता चिकनची बारी! नाशिकमधील घटनेनंतर खळबळ

आइस्क्रीममध्ये बोट निघाल्यानंतर आता चिकनची बारी! नाशिकमधील घटनेनंतर खळबळ 


नाशिक : तुम्ही जर चिकन लव्हर असाल तर ही बातमी वाचून पोटात गोळा आल्याशिवाय राहणार नाही. नाशिकमध्ये एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. नेहमीप्रमाणे एका ग्राहकाने प्रसिद्ध चिनकच्या दुकानातून 2 किलो चिकन खरेदी केलं.

मंगळवारचा दिवस मस्त लेग पिस आणि चिकन रश्यावर ताव मारण्याचा त्यांचा प्लान होता. मात्र, हा आनंद फक्त घरी जाईपर्यंतच टीकाला. कारण, घरी गेल्यानंतर चिकनमध्ये जे दिसलं, त्याने त्यांची चिकन खाण्याची इच्छाच मरुन गेली.

नेमकं काय घडलं?

नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातील आनंद ऍग्रो या चिकन कंपनीच्या दुकानात असलेल्या चिकनमध्ये अळ्या निघाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पाथर्डी फाटा परिसरातील आनंद ऍग्रो कंपनीच्या दुकानात असलेल्या चिकन शॉपमध्ये अळ्या आढळल्याचं एका ग्राहकाने तक्रारीत म्हटलं आहे. पाथर्डी फाटा परिसरात राहणारे ईश्वर माळी हे काल मंगळवारी अकरा वाजता चिकन घेण्यासाठी गेले. चिकन खरेदी केल्यानंतर त्या चिकन मध्ये चक्क आळ्या आल्याचा त्यांना निदर्शनास आले, अळ्या निघालेलं चिकन घेऊन ते दाखवण्यासाठी गेले असता त्यांना कंपनी मॅनेजरकडून शिवीगाळ करण्यात आली असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

बाहेरचं अन्न खाणाऱ्यांनी सावध
मालाडमधील एका डॉक्टरनं ऑनलाईन डिलिव्हरी अॅपमधून घरी आईस्क्रिम मागवलं. मात्र आईस्क्रिम खाताना त्यांना धक्काच बसला. कारण या आईस्क्रिममध्ये चक्क 2 इंच लांबीचा मानवी बोटाचा तुकडा आढळला. तर दुसरीकडे, अमरावतीतील एका हॉटेल मध्ये कॉफी पितांना ग्राहकांच्या ग्लास मध्ये प्लास्टीकचे लहान मोठे तुकडे आढळुन आल्याने एकच खळबळ उडाली. काही दिवसांपूर्वी दुधात चक्क गुरांच्या पानवठ्याच्या हौदातील पाण्याची भेसळ करत असल्याचं समोर आलं होतं. याचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या घटनांमुळे बाहेरचं अन्न खाताना ग्राहकांनी काळजी घेण्याची गरज आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.