Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अखेर 11 वर्षांनंतर पहिल्यांदाच आसाराम बापूंना न्यायालयाकडून जामीन मंजूर, पुण्यात येणार

अखेर 11 वर्षांनंतर पहिल्यांदाच आसाराम बापूंना न्यायालयाकडून जामीन मंजूर, पुण्यात येणार
 

सुरतच्या दोन मुलींवर बलात्कार केल्याप्रकरणी आसाराम बापू यांच्यावर 2013 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी 7 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले. न्यायालयाने सहा आरोपींना निर्दोष ठरवत आसाराम बापूंना दोषी ठरवले.

या प्रकरणात 2018 मध्ये जोधपूर कोर्टाने त्यांना 16 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरवले होते. यानंतर त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पण आता आसाराम बापूंबाबत  मोठी अपडेट समोर आली आहे.

राजस्थानमधील जोधपूर मध्यवर्ती कारागृहात बलात्काराच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूंना अखेर 7 दिवसांचा जामीन मिळाला आहे.मागील 11 वर्षांत त्यांना पहिल्यांदाच जामीन(Bail) मिळाला आहे. वेगवेगळ्या कारणे देत त्यांच्याकडून अनेकदा जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आले होते. पण न्यायालयाने ते वेळोवेळी फेटाळून लावले.मात्र,अखेर आता त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
न्यायालयाने हा पॅरोल त्यांना पुण्यात आयुर्वेदिक रुग्णालयात उपचारासाठी मंजूर केला आहे.आसाराम बापूंना 4 दिवसांपासून जोधपूरच्या एम्स रुग्णालयात श्वसन आणि इतर गंभीर समस्यांमुळे उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्याकडून आयुर्वेदिक उपचाराचा मुद्दा जामीन अर्जात नमूद करण्यात आला होता.न्यायालयाने तो ग्राह्य धरत आसाराम बापूंना जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे.

आसाराम बापूंवर तुरुंगातच उपचार सुरू होते.पण प्रकृती गंभीर स्थितीत पोहचल्याने कडक पोलिस बंदोबस्तात जोधपूरमधील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.आसाराम यांना पॅरोल मिळावा यासाठी त्याच्या अनुयायांनी अनेकवेळा निदर्शनेही केली आहेत.

आसाराम बापू एकेकाळी अध्यात्म क्षेत्रातलं सर्वोच्च पदावर पोहोचलेलं नाव होतं. 400 हून अधिक आश्रम, राजकीय नेतेमंडळी, प्रशासकीय अधिकारी, उद्योजक यांच्यासह देशभरात तयार केलेलं भक्तांचं जाळं, हजारो कोटींची उलाढाल असं विशाल साम्राज्य आध्यात्मिक गुरू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आसाराम बापूंनी निर्माण केले.
आसाराम बापूंवर बलात्काराचा गंभीर आरोप केला आणि अध्यात्म क्षेत्रात नावाजलेल्या भक्तांच्या देवघरापर्यंत पोहोचलेल्या आसाराम बापूंच्या वलयाला उतरती कळा लागली. अध्यात्मासह सर्वच क्षेत्रात खळबळ उडाली. सध्या तुरुंगात शिक्षा भोगत असलेले आसाराम बापू पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.