Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

डॉक्टर पती - पत्नीने घातला 41 लाखांनां गंडा! हॉस्पिटलमध्ये मेडिकल स्टोअर, पॅथॉलॉजी लॅब टाकण्यासाठी पैसे घेऊन केली फसवणूक

डॉक्टर पती - पत्नीने घातला 41 लाखांनां गंडा! हॉस्पिटलमध्ये मेडिकल स्टोअर, पॅथॉलॉजी लॅब टाकण्यासाठी पैसे घेऊन केली फसवणूक 
 

पिंपरी :  देहुरोड येथील हॉस्पिटलमध्ये मेडिकल स्टेअर, पॅथॉलॉजी लॅब टाकण्यासाठी पाच जणांकडून तब्बल ४१ लाख रुपये घेऊन पतीपत्नीने फसवणूक  केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत विजय दत्तु महाडिक (वय ३४, रा. नवी सांगवी) यांनी देहुरोड पोलिसांकडे  फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मनीष नागेश डोईफोडे व पूजा मनीष डोईफोडे या पतीपत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार नोव्हेबर २०२२ पासून आतापर्यंत घडला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, देहुरोड येथे सुभश्री मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल  आहे. डॉ. मनीष डोईफोडे हे त्याचे चालक आहेत. त्यांनी फिर्यादी व सतीश महाजन यांना सांगितले की, हे हॉस्पिटल ३६ बेडचे आहे. हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या सुविधा देत आहोत व मेन रोडपासून जवळ असल्याने खूप बिझनेस होणार आहे, असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. सुभश्री हॉस्पिटल येथे मेडिकल स्टोअर टाकण्यासाठी फिर्यादी यांच्याकडून ११ लाख रुपये घेऊन फसवणूक केली. 

तसेच शुभम बाबुराव हरणे यांना मेडिकल स्टोअर टाकण्यासाठी ११ लाख रुपये घेतले. त्याचप्रमाणे रोहन संतोष निंबळे यांना पॅथॉलॉजी लॅब टाकण्यासाठी ६ लाख, प्रविण रोशन नवले यांना पॅथॉलॉजी लॅब टाकण्यासाठी १० लाख आणि सिद्धार्थ संजय बरळ यांना मेडिकल स्टोअर टाकण्यासाठी प्रत्येकी १० लाख रुपये घेऊन एकूण ४१ लाख रुपये घेऊन पाच जणांची फसवणूक केली. पोलीस उपनिरीक्षक सोळंके तपास करीत आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.