Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

6 दिवसाचा IAS अधिकारी, असं काय घडलं की अचानक गेली DM ची खुर्ची

6 दिवसाचा IAS अधिकारी, असं काय घडलं की अचानक गेली DM ची खुर्ची
 

यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते. काही जण खूप वर्षे मेहनत करून ही परीक्षा पास करतात तर काहींना यश मिळत नाही. काहींना यश मिळूनही केलेल्या एका चुकीचे परिणाम आयुष्यभर भोगावे लागतात.

असाच काहीसा प्रकार एका आयएएस अधिकाऱ्याबरोबर घडला. आज आम्ही तुम्हाला एका आयएएस अधिकाऱ्याची गोष्ट सांगणार आहोत, जो फक्त सहा दिवसांसाठी कलेक्टर राहिला. हा आयएएस त्याच्या बॅचचा सेकंड टॉपर होता. या संदर्भात 'झी न्यूज हिंदी'ने वृत्त दिलं आहे.

2012 च्या बॅचचे आयएएस श्रीराम वेंकटरमण यांची 24 जुलै रोजी जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आणि त्यांनी 26 जुलै रोजी जॉईन केलं. पण 1 ऑगस्ट रोजी त्यांना या पदावरून हटवण्यात आलं. त्यांच्या जागी 2015 बॅचचे आयएएस अधिकारी व्हीआरके तेजा मैलावरपू आता अल्लपुझाचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहतील. या पूर्वी ते शेड्यूल कास्ट डेव्हलपमेंट डिपार्टमेंटचे डायरेक्टर होते. वेंकटरमण यांनी दुसऱ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास केली होती. ते सेकंड रँकने पास झाले होते. वेंकटरमण यांचं 2013 मध्ये केरळमध्ये पोस्टिंग झालं होतं. 2015 त्यांना अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयात सहाय्यक सचिव म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं.
वेंकटरमण यांना वाचनाची, चित्रपट पाहण्याची, प्रवासाची व फोटोग्राफीची आवड आहे. वेंकटरमण यांना बास्केटबॉल आणि क्रिकेट खेळायला आवडतं. ग्रॅज्युएशननंतर त्यांचा मित्र लखमीने यूपीएससी परीक्षेसाठी प्रयत्न करण्यास सांगितलं. श्रीराम आयएएस अधिकारी झाल्यास ते त्यांच्या वैद्यकीय ज्ञानाचा चांगला वापर करू शकतील, असं लखमीने सुचवलं. मग त्यांनी मित्राच्या सल्ल्यावर विचार करून यूपीएससीची तयारी करण्याचा निर्णय घेतला.

आयएएस श्रीराम वेंकटरमण यांची नुकतीच अलपुझाचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती, पण त्याला मोठा विरोध झाला होता. यानंतर केरळ सरकारला आपला निर्णय बदलावा लागला. वेंकटरमण यांनी मद्यधुंद अवस्थेत पत्रकाराला कारने धडक दिली होती, असा आरोप त्यांच्यावर आहे. या अपघातात पत्रकाराचा मृत्यू झाला होता. 3 ऑगस्ट 2019 रोजी घडलेल्या या घटनेत वेंकटरमण हे मुख्य आरोपी होते. वेंकटरमण यांची आता केरळ स्टेट सिव्हिल सप्लाय कॉर्पोरेशन लिमिटेडचे जनरल मॅनेजर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.