पाराशर हीलिंग सेंटर, मालाड ३ वर्षांत ४७ हजार रुग्णांवर उपचार - मधुकर
बघता-बघता तीन वर्षे झाली. १४ ऑगस्ट २०२१ रोजी मालाड येथे ‘पाराशर हीलिंग सेंटर’ सुरू झाले. उद्घाटन केले ते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार िशंदे यांनी. पहिले रुग्ण होते त्यावेळचे महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे. तीन वर्षांत अनेक नामवंत, विविध क्षेत्रांतील व्यक्तिमत्त्वांपासून सामान्य रुग्णांपर्यंत ४७ हजार रुग्णांवर तीन वर्षांत उपचार झाले. त्यातील ९० ते ९५ टक्के रुग्णांना खूप आराम मिळाला. ‘अॅस्टीओपॅथी’ ही एक धन्वंतरी विद्या.. अस्थीरोग रुग्णांना केवळ दोन अंगठ्यांच्या मसाजाने व्याधीमुक्त करणारी. विख्यात अॅस्टीओपॅथ डॉ. गोवर्धनलाल पाराशर यांनी जोधपूर येथे गेले ३५ वर्षे लाखो रुग्णांना याच पद्धतीने उपचार केले. इंजेक्शन नाही... एम. आर. आय. नाही..., गोळी नाही... आैषध नाही... हजारो रुग्ण जोधपूर येथील रुग्णालयात यायचे... रडत यायचे... कुथत यायचे... आपले दु:ख सांगत यायचे अाणि १५ मिनिटांच्या उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत लगेच फरक पडायचा हे डोळ्यांनी पाहिलेले हजारो लोक आहेत. यात अनेक नामवंत आहेत. ‘असा फरक पडू शकतो’ हे बघून थक्क झालेले आहेत. त्यात मी स्वत: आहे... माझी कथा सांगून झालेली आहे. ‘दो अंगुठे की कमाल’ ३१ जानेवारी २०२१ चा हा लेख अजूनही सोशल मिडीयावर व्हायरल होतो आहे. त्यानंतर अनेकांनी माहिती घेतली... जोधपूरला कुठे जायचे... कसे जायचे... विचारले... त्या वर्षात ५० हजार रुग्ण महाराष्ट्रातून जोधपूरला उपचारासाठी गेले. अनेकांना जोधपूरला जायचे होते पण जाणे सोपे नव्हते.... त्यामुळे कल्पना अशी निघाली की, महराष्ट्रात काही ‘आरोग्य शिबीरे’ घेता आली तर तसा प्रयत्न झाला.
कोरोनाचा काळ संपत आला आणि अशा शिबिरांना सुरुवात झाली. त्यात महाराष्ट्रात १० शिबिरे झाली. हजारो रुग्णांना मोफत उपचार झाले. स्वत: डॉ. गोवर्धनलाल पाराशर आणि त्यांची टीम यांनी हजारो रुग्णांच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहिले. त्यानंतरचा पुढचा विचार होता की, ‘मुंबईत असे उपचार केंद्र स्थापन करता येईल का?’ मुंबईतील जागा, त्याच्या किंमती, सगळे विषय आवाक्याबहेर होते. पण, श्री. अशोक मुन्शी आणि श्री. िकशोर आग्रहारकर यांनी मनावर घेतले. आम्ही तिघांनी मिळून तीन महिने जागा पाहिल्या. शेवटी मालाड येथे त्या मानाने परवडणारी जागा मिळाली. आर्थिक व्यवहार मुन्शीजींनी अंगावर घेतला. गेले तीन वर्षे सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत अशोक मुन्शी यांनीच या केंद्राची सगळी जबाबदारी अंगावर घेवून सेवाभावनेने त्यांनी हे केंद्र यशस्वी केले आहे आणि पिडीत रुग्णांचे ते एक आश्रयस्थान झाले. त्यांची कन्या आंचल आणि अन्य सहकारी तसेच जोधपूरहून येणारे डॉक्टर नंदकुमार पाराशर, डॉ. गिरीराज पाराशर,
डॉ. हेमंंत पाराशर, डॉ. ब्रम्हसिंग चौधरी, डॉ. मनोज पुरी, डॉ. सुरजभान सिंग आणि िफजीओथेरपी विभागप्रमुख डॉ. दिलीपकुमार कछवाह यांनी तीन वर्षे मुंबईच्या रुग्णांना फार मोठी सेवा दिली आहे. मणक्याचे दुखणे, कंबरेतील दुखणे, गुडघ्यातील दुखणे, हातातला मुंग्या येणे, चालताना तोल जाणे, अशा अनेक प्रकारच्या व्याधी अनेकांना असतात. त्या-त्या स्थानिक डॉक्टरांकडील उपचार झाल्यांनतर जेव्हा पूर्ण आराम मिळत नाही, त्यावेळी असे अनेक रुग्ण मालाडच्या सेंटरला येतात. आणि पूर्ण बरे होऊन जातात. याची शेकडो उदाहरणे आहेत.परवा तर फार विलक्षण अनुभव आला. प्रख्यात बासरीवादक हरिप्रसादजी चौरसिया यांचाच फोन आला... त्यांना पाठ, कंबरेमध्ये दुखत होते की, उभे राहणे कठीण होते. त्यांनी पत्ता मागितला... एवढ्या मोठ्या माणसाला वाहतुक कोंडीतून उपचारासाठी मालाडला बोलवायचे हे पटले नाही. आमच्या सेंटरचे कार्यकारी संचालक मुन्शीजी म्हणाले की, ‘अरे बडेसाब, आप क्यूँ तकलीफ उठाते हो.... हम डॉक्टर को लेके आते हैं...’ आणि ते स्वत: डॉक्टर ब्रम्हसिंग यांना घेऊन गेले. दोन दिवसांच्या उपचारानंतर या पद्मभूषण चौरसिया साहेबांना इतकं बरं वाटलं की.... त्यांचा दिल्लीला जाण्याचा कार्यक्रम त्यांनी रद्द केला होता. ‘आता मी दिल्लीजा जाऊ शकतो’ या विश्वासाने त्यांनी पुन्हा दिल्लीला कळवले आणि परवा ते दिल्लीला कार्यक्रमाला गेले. परत आल्यावर ते उपचार घेणार आहेत. दोन उपचारानेच ते थक्क झाले. जाहिरातीसाठी िकंवा प्रचारासाठी हे लिहित नाही. जे अनुभव आले... जे पाहिले.... जे डोळ्यांना दिसते आहे तेच सांगतो आहे. मला स्वत:ला जो फायदा मिळाला तो इतरांना मिळाला पाहिजे, हीच या मागची नितळ भावना आहे. आणि मनापासून सांगतो, संपूर्ण पाराशर परिवाराची या व्यवसायातील भावना ‘धंद्याची’ नाही. पूर्ण सेवाभावाची आहे. डॉ. गोवर्धनलाल पाराशर यांना देशातील सर्वात श्रीमंत असलेल्या एका उद्योगपतीच्या मातोश्रींवर उपचार केल्यानंतर त्या उद्योगपतींनी १०० कोटी रुपयांचा चेक देऊ केला आणि ‘मुंबईत रुग्णालय उभे करा,’ असे सांगितले.... पण डॉ. पाराशर यांनी नम्रपणे नकार देऊन सांगितले की, ‘आपके बडे अस्पताल में गरिब मरिज नही आयेंगे...’ त्यांनी तो चेक परत केला. ही घडलेली हकिकत आहे. सामान्य माणसाला किती फायदा होतो, हे ज्यांनी अनुभवले आहे, तेच सांगू शकतील...
आणखी एक उदाहरण.... सुुरुवातीलाच एक फोटो टाकला आहे... तो फोटो आहे लंडनला राहणाऱ्या मनीषा हडप यांचा. त्यांना चालताना पाय सरळ टाकता येत नव्हता.... थोडा वाकडा पडायचा... वेदना व्हायच्या... लंडनमध्ये उपचार झाले... फार फरक जाणवला नाही.... त्यांच्या संभाजीनगर येथे राहणाऱ्या वडीलांनी त्यांना सुचवले की, ‘मुंबई आणि जोधपूरला असे एक रुग्णालय आहे... आणि तेथे डॉक्टर पाराशर आहेत... प्रयोग करून बघ...’ वडिलांच्या शब्दावर विश्वास ठेवून मनीषा हडप लंडनहून उपचारासाठी अाल्या. आणि पाराशर साहेबांनी त्यांना १५ दिवसांत ठीक केले. मालाडच्या केंद्रावरही माजी गृहमंत्री सुशीलकुमार िशंदे व त्यांच्या पत्नी उज्ज्वलाताई शिंदे, माजी राज्यपाल डॉ. डी. वाय पाटील, माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे, राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष, सहकारतज्ञा बाळासाहेब अनासकर, माजी खासदार स्व. बाळासाहेब धानोरकर, खासदार अरविंद सांवंत, आय.ए.एस. अधिकारी अविनाश ढाकणे, मुंबईचे उपपोलीस आयुक्त मिलिंद भांबरे, सहाय्यक पोलीस आयुक्त शबाना शेख, भुसावळचे सिनिअर पोलीस निरीक्षक कृष्णा पिंगळे, प्रख्यात गायक अनुप जलोटा, चित्रपटातील खलनायक रणजीत, लेखक अच्युत गोडबोले, गायक रवींद्र साठे, पद्मश्री मधुमंगेश कर्णिक, प्रख्यात ‘मराठीबाणा’कार अशोक हांडे असे अनेक नामवंत उपचाराकरिता अालेले आहेत. आणि त्यांना खूप मोठा फरक पडलेला आहे. सामान्य रुग्णांमध्ये स्त्रियांची संख्या जास्त आहे. कमरेचा जास्त त्रास त्यांना होत असतो. पण आता फिजिओथेरपीचाही प्रभावी उपचार मालाड येथे आहे. या सेवाकेंद्रात पाच डॉक्टर यांच्यासह ३५ सहकाऱ्यांची सेवा तेवढीच मोलाची आहे. चार वर्षांपूर्वी असे कधीही वाटले नव्हते की, मुंबईत असे काही सुरू होईल आणि सामान्य रुग्णांना अल्प पैशांत खूप फायदा होऊ शकेल.... जोधपूरला जाऊन आल्यावर तर याची खात्रीच पटते की, अॅस्टीओपॅथी या वैद्यक शास्त्रात फार मोठे सामर्थ्य आहे.
दुर्दैवाने एक मोठा आघात झाला... लाखो रुग्णांवर उपचार करणारे डॉ. गोवर्धनलाल पाराशर २२ मार्च २०२३ रोजी अवघ्या १० सेकंदाच्या जबरदस्त हृदयविकाराच्या झटक्याने सगळ्यांना दु:खात लोटून गेले. विश्वास बसणार नाही असे भयानक दु:ख केवळ त्यांच्या परिवारालाच नव्हे हजारो रुग्णांनी व्यक्त केले. नियतीच्या पुढे कोणाचे काही चालत नाही... विनोबा म्हणायचे की, ‘मृत्यू यावा तर असा....’ पण, पाराशर साहेबांच्या बाबतीत असे वाटते की, तो मृत्यू आज ना उद्या प्रत्येकाला येणार असला तरी पाराशर साहेबांना २५ वर्षांनंतर यायला हवा होता.... त्यांच्या दोन अंगठ्यांमध्ये अनेकांनी परमेश्वर पाहिलाय....कारगिल युद्धावर प्रत्यक्ष लढलेले वायु दलातील संदेश सिंघलकर हे वायुदलाच्या विमानातून खाली पडले... मणक्याला मोठा मार बसला... सगळे उपचार झाल्यावर ते जोधपूरला आले... आणि १५ दिवसांनंतर ते मला म्हणाले, ‘अहो, गोवर्धनलाल पाराशर हा देवमाणूस आहे...’ कोणाला त्यांच्यात देवमाणूस दिसला.... सामान्य रुग्णांना आपले दु:ख दूर करणारा हा सुखकर्ता- दु:खहर्ता दिसला. त्यांच्या निधनानंतर जोधपूर आणि मालाड सेंटरमधील सर्व डॉक्टर आणि सहकारी मस्तक बधीर व्हावे, अशा स्थितीत होते. पण, शेवटी नियतीच्या पुढे कोणाचे काही चालत नाही... डॉ. पाराशर यांनी ज्या ध्येयाने ही उपचारसेवा चालू ठेवली त्याच मार्गाने चालण्याचा निर्धार करून जोधपूर आणि मालाडची सर्व टीम पुन्हा जिद्दीने उभी राहिली. आजही जोधपूरला सकाळी ८ वाजले की, शेकडो रुग्णांची रांग लागलेली दिसते. आणि मालाडच्या पाराशर केंद्रावरही अनेक पिडीत रुग्ण आपले दु:ख सांगत येतात. आणि हसत हसत निरोप घेऊन जातात. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हाच त्या दिवसातील सगळ्यात मोठा क्षण असतो. तो अनेकजण अनुवभवित आहेत.चौथ्या वर्षात पाऊल ठेवतना मालाडच्या पाराशर हीलिंग सेंटरला, सर्व डॉक्टर चमूला, अन्य सर्व सहकाऱ्यांना मन:पुर्वक शुभेच्छा! आणि सर्व रुग्णांना अशीच सेवा मिळत रहावी, ही अपेक्षा... खासकरूनश्री. अशोक मुन्शी यांनी याच निष्ठेने हे केंद्र चालवावे, याकरिताही शुभेच्छा!संपर्क : श्री. अशोक मुन्शी : . पाराशर हेलिंग सेंटर मालाड मुंबई 022 - 40128125022 - 46037058Mobile:+91 9833770304+91 9833770305
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.