मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची घोषणा ऑक्टोबरमध्ये होईल आणि २६ नोव्हेंबरपूर्वी निवडणुकीची सर्व प्रक्रिया होईल, असे केंद्रीय निवडूक आयोगाने जाहीर केले.
केंद्रीय निवडणूक आयोगाने हरियाणा आणि जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तारखा शुक्रवारी जाहीर केल्या असून जम्मू काश्मीर मध्ये 3 टप्यात निवडणूक होणार आहेत. तर हरियाणा मध्ये एकाच टप्यात निवडणूक होणार आहे. या निवडणुकांचे निकाल 4 ऑक्टोबरला जाहीर होणार आहेत. त्यानंतर महाराष्ट्र आणि झारखंडच्या निवडणुका जाहीर होणार असल्याचे आयोगाने सांगितले आहे. महाराष्ट्र आणि झारखंडच्या निवडणूक एकाच वेळी होणार असल्याचेही आयोगाने सांगितले आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले की, जम्मू- काश्मीर विधानसभेच्या निवडणूक 18, 25 , सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर अशा तीन टप्यात होणार आहेत. सीमांकानंतर जम्मू काश्मीरमध्ये 90 विधान सभा स्थापन करण्यात आल्या आहेत. यात 73 सर्वसाधारण ,9 अनुसूचित जाती, 6 अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. जम्मू काश्मीर मध्ये सर्व उमेदवारांना समान सुरक्षा मिळेल. निवडणुकीवेळी कडक सुरक्षा ठेवण्यात येणार असल्याचे राजीव कुमार यांनी सांगितले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.