Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

लुटमार करणाऱ्या तीन युवकांना अटक दागिने जप्त, संजयनगर पोलिसांची कारवाई

लुटमार करणाऱ्या तीन युवकांना अटक दागिने जप्त, संजयनगर पोलिसांची कारवाई
 

शहरातील पंचशीलनगर येथे रात्री उशीरा एका तरूणाच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसडा मारून चोरणाऱ्या तीन युवकांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून चोरलेली सोन्याची चेन जप्त करण्यात आली. संजयनगर पोलिसांनी ही कारवाई केली.

सारंग दिलीप वारे (वय १९), दीपक दगडू सकट (वय १९), प्रतीक मनोज कांबळे (वय १९, तिघेही रा. चिंतामणीनगर झोपडपट्टी, सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास पंचशीलनगर येथे रोहन दाभोळे हा तरूण चालत घरी निघाला होता. त्यावेळी काही तरूणांनी त्याच्या गळ्यातील चेन हिसडा मारून चोरून नेली होती. याबाबत संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयितांचा शोध गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक घेत होते.

पथक चोरट्यांची माहिती घेत असताना हा गुन्हा वरील तीन संशयितांनी केल्याची माहिती मिळाली. तिघांनाही ताब्यात घेऊन कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरलेली सोन्याची चेन जप्त करण्यात आली. संजयनगरचे पोलिस निरीक्षक बयाजीराव कुरळे यांच्या मार्गदर्शनाने संतोष पुजारी, कपील साळुंखे, नवनाथ देवकाते, आकाश गायकवाड, सुशांत लोंढे, मौहन सोनावणे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.