पॅरिस ऑलिम्पिकबाबत दररोज एकापेक्षा एक बातम्या समोर येत आहेत. फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ स्पर्धेत एक विचित्र घटना समोर आली आहे.
एका महिला खेळाडूला पॅरिस ऑलिम्पिकमधून मायदेशी पाठवण्यात आले कारण ती खूपच सुंदर होती. होय, तुम्ही बरोबर वाचत आहात, हे घडले आहे. 20 वर्षीय पॅराग्वेयन जलतरणपटू लुआना अलोन्सो हिला ऑलिम्पिक व्हिलेजमधून तिच्या देशात परत पाठवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे वृत्त आहे.
फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक 2024 मध्ये एक अतिशय विचित्र बातमी समोर आली आहे. पॅराग्वेच्या 20 वर्षीय जलतरणपटू लुआना अलोन्सोला अधिक सुंदर असणं महागात पडलं आहे. 11 ऑगस्ट रोजी होणाऱ्या पॅरिस गेम्सच्या अधिकृत समारोपापर्यंत खेळाडूंना ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये राहण्याची परवानगी दिली जाते. मात्र तिला ऑलिम्पिक व्हिलेजमधील तिचे निवासस्थान रिकामे करण्यास आणि ऑलिम्पिक सोडून आपल्या देशात परत जाण्यास सांगण्यात आले. आणि ती मायदेशात परतली असून पॅराग्वेला परतल्यानंतर लुआना अलोन्सो हिने जलतरणातून निवृत्तीची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. केवळ तिच्या सौंदर्याने हे घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
एका वृतसंस्थेच्या बातमीनुसार, ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यासाठी आलेल्या काही पॅराग्वेच्या खेळाडूंनी लुआनाच्या सौंदर्याबाबत अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यासाठी आलेल्या खेळाडूंनी सांगितले की, लुआना इतकी सुंदर आहे की त्यांना खेळावर लक्ष केंद्रित करता येत नव्हते. तक्रार दाखल केल्यानंतर जेव्हा अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली तेव्हा त्यांनीही या महिला खेळाडूचे सौंदर्य लक्ष वेधून घेणारे असल्याचे म्हटले आहे. पराग्वेच्या खेळाडूंसोबत उपस्थित अधिकाऱ्यांना असे वाटले की, लुआनाच्या सौंदर्याचा खेळाडूंच्या खेळावर परिणाम होऊ शकतो. जर खेळाडूंनी खेळावर लक्ष केंद्रित केले नाही तर पदक जिंकण्याची देशाची आशा पूर्ण होणार नाही. त्यामुळे लुआना हिला मायदेशी पाठवण्यात आले.
दरम्यान, अनेक वृत्तसंस्थेच्या बातम्यामध्ये असा दावा करण्यात आला आहे की, लुआनाचे कपडे आणि वागणूकीमुळे संघातील वातावरण बिघडत होते. त्यामुळे तिला मायदेशी पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात ब्रिटीश टॅब्लॉइड द सन या वृत्तसंस्थेने ही बातमी सर्वात आधी दिली होती. पॅराग्वेच्या ऑलिम्पिक समितीच्या प्रमुख लॅरिसा शेरेर यांचा हवाला देत ही बातमी देण्यात आली होती. तर इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, लुआनाला मायदेशी पाठवण्यात कारण तिचे अफाट सौंदर्य आहे. तिच्या सौंदर्याने तिच्याच संघातील उर्वरित खेळाडूंचे लक्ष विचलित करत असल्याचे कारण देण्यात आलं आहे.अशीही माहिती समोर येत आहे की, जलतरणपटू लुआना अलोन्सो ही महिलांच्या 100 मीटर बटरफ्लाय स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पात्र ठरू शकली नाही, ज्यामुळे ती मायदेशी परतली. तर, लवकर निवृत्ती किंवा गैरवर्तनामुळे तिला ऑलिम्पिक व्हिलेज लवकर सोडावे लागल्याचा दावा अनेक वृत्तसंस्थेने केला आहे.
तर दुसरीकडे ‘लुआना अलोन्सो’वर तिच्या हॉट ड्रेसने तिच्याच टीममेट्सचे लक्ष विचलित केल्याचा आरोप आहे. ऑफिशियल किट ऐवजी बिकिनी सूट घालून ती ऑलिम्पिक खेळ गावात फिरत असे. ओलोन्सोवर आपल्या संघाची शिस्त न पाळणे, स्वत:च्या इच्छेनुसार कपडे घालणे आणि मनमानी करणे असे आरोप आहेत. अलोन्सोच्या कृत्यामुळे, त्याच्या टीमने तिला ॲथलीट गावातून हद्दपार करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे. यानंतर उर्वरित सामन्यांसाठी ती पॅरिसमधील एका महागड्या हॉटेलमध्ये राहिली. ती विरोधी संघात जास्त मिसळत असे असेही बोलले जात आहे. त्यामुळेच पॅराग्वेने आपल्या 20 वर्षीय सुंदर जलतरणपटूला परत पाठवले आहे.
याबाबत इंस्टाग्रामवर लुआना अलोन्सोने दिलं स्पष्टीकरण…
मात्र या बातम्यानंतर स्वत: 20 वर्षीय जलतरणपटू लुआना अलोन्सोने ऑलिम्पिक गाव सोडण्यास सांगितलेल्या मुद्द्यावर भाष्य केले आहे. तिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये, तिला ऑलिम्पिक गावातून बाहेर काढल्याच्या बातम्या फेटाळल्या आहेत. इंस्टाग्राम स्टोरीजवर लुआना अलोन्सोने स्पॅनिशमध्ये लिहिले आहे की, “मी फक्त हे स्पष्ट करू इच्छिते की, मला कधीही कोठूनही काढून टाकण्यात आलेले अथवा बाहेर जाण्यास सांगितलेले नाही. चुकीची माहिती पसरवणे थांबवा. मला कोणतेही विधान करायचे नाही, पण मी खोट्याचाही माझ्यावर प्रभाव पडू देणार नाही. याबरोबरच तिने अशी चुकीची माहिती पसरवू नये असं आवाहन केलं आहे.”दरम्यान, लुआना अलोन्सोने 27 जुलै रोजी महिलांच्या 100 मीटर बटरफ्लाय सेमीफायनलसाठी केवळ 0.24 सेकंदांनी पात्रता गमावली. यानंतर लगेचच तिने खेळातून निवृत्ती जाहीर केली, परंतु ऑलिम्पिक गावात राहणे सुरूच ठेवले होते. त्यानंतर लुआनाच्या सौंदर्यामुळे बरीच चर्चा झाली होती. यानंतर तिच्या हकालपट्टीच्या अनेक वेगवेगळ्या बातम्या समोर आल्या, त्यानंतर तिने स्वत: याबाबत सोशल मिडियाव्दारे स्पष्टीकरण दिले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.