Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

75 लाखांचीं लाच घेताना BMC चा अभियंता मंदार तारी याला रंगेहात पकडले, लाचलुचपतची कारवाई

75 लाखांचीं लाच घेताना BMC चा अभियंता मंदार तारी याला रंगेहात पकडले, लाचलुचपतची कारवाई
 

बृहन्मुंबई महानगरपालिकेचा कार्यकारी अभियंता तथा प्रस्ताव विभाग पदनिर्देशित अधिकारी मंदार अशोक तारी याला तब्बल ७५ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी सापळा रचून ही मोठी कारवाई केली. तारी याने अनिधिकृत इमारत न पाडण्याबद्दल इमारत मालकाकडे तब्बल दोन कोटींची लाच मागितली होती. त्यातील पहिला हप्ता म्हणून ७५ लाख रुपये स्वीकारताना तारी याला अटक करण्यात आली. तारी याच्याबरोबर प्रतीक पिसे (वय ३३) आणि मोहमद शेहजादा मोहमद यासीन शहा (वय ३५) या दोघांना अटक केलेली आहे.

अनिधिकृत इमारत न पाडण्यासाठी लाचेची मागणी 

यातील तक्रारदार व्यक्तीची चारमजली इमारत असून त्यामधले वरील दोन मजले अनधिकृत आहेत. ही इमारत न पाडण्याबद्दल आणि नियोजित प्लॉट खरेदी केल्यानंतर तेथील अनधिकृत बांधकामाबाबत सहकार्य करण्यासाठी मंदार अशोक तारी याने तक्रारदार व्यक्तीकडे २ कोटींची लाच मागितली. त्यानंतर तक्रारदाराने या प्रकरणाची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली. त्यानुसार मंगळवारी लाचलुचपत विभागाने सापळा रचला आणि ७५ लाख रुपये स्वीकारताना तारी याला अटक केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर पोलिस आयुक्त संदीप दिवाण आणि अप्पर पोलिस आयुक्त राजेंद्र सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.