Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'लाडके लेकरू' योजना आणून आम्हालाही पगार सुरू करा; भोऱ्याचं आणखी एक भाषण व्हायरल

'लाडके लेकरू' योजना आणून आम्हालाही पगार सुरू करा; भोऱ्याचं आणखी एक भाषण व्हायरल
 

वडीगोद्री (जालना) : मोठाल्या पोरांना सरकार ने पगार सुरू केलाय आम्ही बारक्या पोरांनी सरकारचं काय घोडं मारलं आम्हाला सुद्धा खर्चा पाण्याला पैसे लागतात असं म्हणत कार्तिक वजीर याने सरकारकड सरसकट मुलांना पगार सुरू करण्याची मागणी केली आहे.

अंबड तालुक्यातील रेवलगाव येथील जिल्हा परिषद शाळेत ३ री वर्गात शिकणाऱ्या कार्तिक वजीरने दमदार भाषण केल्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. सुट्टी असली की बारकाल्या पोरांना घरची काम सांगतात स्वातंत्र नावाचा गलत इस्तेमाल करतात मोठी माणसं सरकारने सगळ्यांना पगार सुरू केला हे बंद करा अशाने आळशी पिढी तयार होईल, मग पुन्हा इंग्रज येऊन तुम्हाला गुलाम करतील असा सल्ला कार्तिक ऊर्फ भोऱ्या वजीर याने सरकारला दिला आहे. चिमुकल्या कार्तिक वजीर ने स्वातंत्र्य दिनी जिल्हा परिषद शाळेत भाषण केले आहे.

आज स्वातंत्र्यदिनी बारक्या पोरांना अजून खरंच स्वातंत्र्य आहे का असा प्रश्न विचारला आहे.सुट्टी असली की घरचे काम, रानातले काम, स्वातंत्र्य नावाला काही गोष्ट आहे की नाही.आम्हाला मिळालेले स्वातंत्र्य नावाचा गलत इस्तेमाल करायला लागले मोठाले माणसं असं म्हणत त्याने लहान मुलांच्या स्वातंत्र्याबद्दल प्रश्न उपस्थित केले आहे. इंग्रज कडू होते जुलमी होते पण आपल्या क्रांतिकारी लोकांनी त्यांना पाणी पाजलं. आपल्याला स्वातंत्र्य मिळालं पण आपल्यासारख्या बारक्या पोरांना अजून खरंच स्वातंत्र्य आहे का ? कुणी येत आणि मलाच काम सांगतं सुट्टी असली की घरचे काम रानातले काम, स्वातंत्र्य नावाला काही गोष्ट आहे की नाही.

सरकारने बारीक-सारीक लाडका लेकरू योजना आणावी आणि सरसकट बारकाल्या मुलांना पगार सुरू करावा अशी मागणी करत शहाणे व्हा कष्ट करा कष्टाशिवाय पर्याय नाही.तर स्वातंत्र्यदिनी भोऱ्याने केलेल्या भाषण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.