शरीर संबंधांसाठी वापरले जातात हे 'कोड वर्ड्स', सेक्स वर्करचे धक्कादायक खुलासे
मुंबई : पत्नी असूनही दुसऱ्या महिलेशी अफेअर असणं, शारीरिक संबंध ठेवणं असे प्रकार सर्रास घडतात, ज्याला विवाहबाह्य संबंध म्हणतात. परदेशात वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांची जागा सेक्स वर्कर्सनी घेतली आहे.
अनेक देशांत सेक्स वर्करकडून सर्व्हिस घेणं हे कल्चर आहे. एका सेक्स वर्करने तिच्या ऑटोबायोग्राफीमध्ये या व्यवसायाबद्दल चकित करणारे खुलासे केले आहेत. या महिलेचं नाव चार्लोट शेन असून, ती युनायटेड किंग्डममध्ये (ब्रिटन) राहते.
वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये प्रसिद्ध झाली ऑटोबायोग्राफी
'अॅन ऑनेस्ट वूमन' या आत्मचरित्रात चार्लोटने तिचा सेक्स वर्कर म्हणून 20 वर्षांचा अनुभव सांगितला. ब्रिटनचे श्रीमंत लोक तिचे ग्राहक होते. ते तिच्याशी किंवा इतर सेक्स वर्कर्सशी कसे डील करायचे? ते 'हॉर्नी'ऐवजी कोणता शब्द वापरायचे? श्रीमंत लोक सेक्स वर्कर्सना कामावर ठेवण्याचा कसा दिखावा करतात आणि त्यांना पैसे देऊन एंजॉय करतात तेही सांगितलं. चार्लोट हॉटेलमध्ये सर्व्हिस द्यायची. तिच्या ऑटोबायोग्राफीतला काही भाग वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला. चार्लोट 2010च्या दशकात या व्यवसायात आली. कारण तिला लोकप्रियता हवी होती. ब्रिटनचे श्रीमंत लोक सेक्स वर्करशी कसा बिझनेस करतात तेही तिने यात सांगितलं.
सेक्स वर्करने तिच्या ग्राहकाचा केला उल्लेख
चार्लोट म्हणाली, की अमेरिकेतले श्रीमंत लोक सेक्स वर्कर्सना हॉटेल्समध्ये भेटतात, त्यांना आकर्षित करण्यासाठी सेक्सी दिसणारे कपडे घालावे लागतात. बोलताना सिक्रेट कोड्स वापरले जातात. त्यामध्ये उत्सुकचा अर्थ कामुक, वेळ घालवण्याचा अर्थ संबंध प्रस्थापित करणं, मित्र याचा अर्थ वारंवार येणारा ग्राहक अशा कोड्सचा समावेश होता. तिने ऑटोबायोग्राफीमध्ये एका ग्राहकाचा उल्लेख केला, ज्याला तिची वेबसाईट आवडली होती. तेव्हा ती 28 वर्षांची आणि ग्राहक रोजर 54 वर्षांचा वकील होता. त्याचा मेल आला, की तो गुरुवारी तिच्याबरोबर दोन तास मैत्री करण्यासाठी वेळ घालवू इच्छितो. यानंतर ती त्याला डाउनटाउनच्या डीसी मॅरियट हॉटेलमध्ये भेटली होती.
व्यवसाय सोडण्यामागचं कारण
मीडिया रिपोर्टनुसार, चार्लोटने सांगितलं ती पुरुषांना भेटल्यावर एक ई-मेल पाठवायची, त्यात धन्यवाद लिहायची. काहींमध्ये ती लवकरच भेटू असं म्हणायची. तिला काही पुरुष मेल पाठवायचे आणि आधीपेक्षा जास्त एंजॉयमेंटची अपेक्षा ठेवायचे. रोजरला तिसऱ्या डेटला सर्वाधिक आनंद मिळाला होता. 10 जुलै 2024 ला लिहिलेल्या ब्लॉग पोस्टमध्ये चार्लोटने खुलासा केला, की स्वतःचं मार्केटिंग करावं लागत असल्याने तिने सेक्स वर्कचं काम सोडलं. या क्षेत्रात जाहिरातीही द्याव्या लागतात असं तिने सांगितलं.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.