Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शाळेतील सीसीटीव्ही फूटेज गायब, मुख्याध्यापिकाही फरार, बदलापूर प्रकरणात धक्कादायक माहिती समोर

शाळेतील सीसीटीव्ही फूटेज गायब, मुख्याध्यापिकाही फरार, बदलापूर प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
 

बदलापुरातील शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटताना दिसत आहेत. मुलींवर अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी होत आहे.

याबाबत पोलीस तपास सुरू आहे.

असे असताना आता शाळेतील गेल्या १५ दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज गायब असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सरकारच्या द्विसदस्यीय अहवालातून समोर ही गोष्ट आली. यामुळे आता या प्रकरणी संशय वाढतच चालला आहे. यामुळे सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.

तसेच महिला सेविकांनी त्यांचे काम नीट केले नाही म्हणून त्यांनाही सहआरोपी बनवण्यात यावे, अशी शिफारस करण्यात आली आहे. पीडित मुलीच्या वैद्यकीय चाचणीला उशीर झाल्याने अनेक गोष्टींवर त्याचा परिणाम झाला. उशीर कशामुळे झाला याबाबत देखील माहिती द्या, असे म्हटले जात आहे.

याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. बदलापूर येथील लैंगिक अत्याचार प्रकरणी महिला व बालकल्याण विभाग आणि शिक्षण मंत्रालयाने अहवाल तयार केला. अहवाल सोमवारी शिंदे गटाचे नेते आणि शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यामध्ये ही माहिती दिली आहे.

दरम्यान, दीपक केसरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बदलापूर शाळेतून गेल्या १५ दिवसांचे फुटेज गायब आहेत. हे फुटेज गायब का झाले आणि त्यामागचा हेतू काय आहे, याचा तपास होणे गरजेचे आहे, असे केसरकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे. यावेळी अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
सीसीटीव्ही गायब झाल्यामुळे आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शाळा व्यवस्थापनाकडून घटना लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला. अशा गंभीर घटनेत शाळेचे मुख्याध्यापक आणि व्यवस्थापन मंडळ उदासीन असल्याचे आढळून आले. बदलापूर शाळेतील निलंबित मुख्यधापिकेला पोलिसांनी फरार आरोपी म्हणून जाहीर केले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.