सर्वसामान्य नागरिकांना नव्हे, फक्त या व्यक्तींना कारवर तिरंगा लावण्याचा अधिकार, वाचा यादी
संपूर्ण भारतात 15 ऑगस्ट 2024 रोजी स्वातंत्र्यदिन साजरा केला जाणार आहे. याची तयारी जोरात सुरु आहे. याच दिवशी 1947 रोजी भारताला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले होते.
दरवर्षी 15 ऑगस्टला देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अनेक ठिकाणी ध्वजारोहण केले जाते. तुम्ही अनेकदा काही वाहनांवर तिरंगा ध्वज लावलेला पाहिला असेल. मात्र सामान्य नागरिकांना आपल्या वाहनावर अधिकृतरित्या भारताचा ध्वज लावता येत नाही. फक्त काही व्यक्तींनाच आपल्या कारवर हा झेंडा लावता येतो. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
कारवर राष्ट्रध्वज लावण्याबाबतचा नियम
देशातील काही निवडक व्यक्तींना त्यांच्या कारवर भारतीय राष्ट्रध्वज म्हणजेच तिरंगा लावण्याचा विशेषाधिकार आहे. भारतीय ध्वज संहिता 2002 मध्ये याचा उल्लेख आहे. या संहितेच्या 20व्या आणि 21व्या पानावर याची माहिती देण्यात आलेली आहे. भारतीय ध्वज संहिता 2002 च्या कलम 9 मध्ये असे नमूद केले आहे की केवळ खालील मान्यवरांना मोटार कारवर राष्ट्रध्वज फडकवण्याचा विशेषाधिकार आहे.
केवळ हे मान्यवर आपल्या वाहनावर राष्ट्रध्वज लावू शकतात
राष्ट्रपतीउपराष्ट्रपतीराज्यपाल आणि लेफ्टनंट-गव्हर्नरपरदेशात नियुक्त केलेले भारतीय दूतावास आणिकार्यालयांचे प्रमुखपंतप्रधान आणि इतर कॅबिनेट मंत्रीकेंद्रीय राज्यमंत्री आणि उपमंत्री;राज्ये किंवा केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री आणि इतर कॅबिनेट मंत्रीराज्ये किंवा केंद्रशासित प्रदेशांचे राज्यमंत्रीलोकसभेचे अध्यक्षराज्यसभेचे उपसभापतीलोकसभेचे उपसभापतीराज्य विधान परिषदांचे अध्यक्षराज्य आणि केंद्रशासित प्रदेश विधानसभांचे अध्यक्षराज्य विधान परिषदेचे उपाध्यक्षराज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभांचे उपसभापतीसर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशसर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशउच्च न्यायालयांचे मुख्य न्यायाधीशउच्च न्यायालयांचे न्यायाधीश.
कारवर ध्वज कधी लावावा?
भारतीय ध्वज संहिता 2002 नुसार वरील मान्यवरांना जेव्हा आवश्यक किंवा योग्य वाटेल तेव्हा त्यांच्या कारवर राष्ट्रध्वज लावू शकतात. तसेच सरकारने उपलब्ध करून दिलेल्या कारमधून परदेशी प्रतिष्ठित व्यक्ती प्रवास करत असेल तर कारच्या उजव्या बाजूला भारताचा राष्ट्रध्वज आणि कारच्या डाव्या बाजूला संबंधित देशाचा ध्वज लावला जातो.
भारताच्या राष्ट्रध्वजाची माहिती
भारतीय राष्ट्रध्वजावर तीन रंगीत आडवे पट्टे आहेत. वर भगवा, मध्यभागी पांढरा आणि तळाशी गडद हिरवा आणि तिन्ही समान प्रमाणात आहेत. ध्वजाच्या रुंदीचे आणि लांबीचे गुणोत्तर 2 आणि 3 आहे. पांढऱ्या पट्टीच्या मध्यभागी अशोकचक्र आहे. 15 ऑगस्ट 1947 ते 26 जानेवारी 1950 दरम्यान तिरंगा हा भारताचा राष्ट्रध्वज म्हणून स्वीकारण्यात आला होता.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.