माझ्या स्तनांबद्दल पालकांनी का तक्रार केली? शिक्षिकेची पोस्ट व्हायरल
मुंबई: अनेक शाळांमधल्या शिक्षकांना विशिष्ट ड्रेसकोडचं पालन करावं लागतं. असं असूनही एका शिक्षिकेला विचित्र घटनेला सामोरं जावं लागलं आहे. शाळेतल्या एका शिक्षिकेचं म्हणणं आहे, की एका विद्यार्थ्याच्या पालकांनी तिच्या स्तनांबाबत शाळा प्रशासनाकडे तक्रार केली आहे.
संबंधित शिक्षिकेने रेडिटवर याबाबत एक पोस्ट लिहिली आहे. ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या पोस्टवर अनेक युझर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. शिक्षिकेचं म्हणणं आहे की, ती नेहमी शाळेचा ड्रेस कोड पाळते आणि नियमानुसार कपडे घालते. तरीदेखील तिची तक्रार करण्यात आली.संबंधित शिक्षिकेनं सांगितलं, की ती माध्यमिक शाळेतली शिक्षिका असून, इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना शिकवते. तिचे स्तन खूप मोठे आहेत. त्यामुळे ते लपवणं कठीण आहे. ती नेहमी ड्रेस कोडचं पालन करते. गेल्या सहा वर्षांपासून ती विद्यार्थ्यांना शिकवत आहे आणि या काळात तिने कधीही ड्रेस कोड टाळला नाही. प्रत्येक जण नेहमी तिच्या पोशाखाची स्तुती करतं.
शिक्षिकेने पुढे सांगितलं, की एक दिवस शाळा प्रशासकाने एका पालकाची तक्रार तिला सांगितली. पालकांनी शाळेत येऊन तक्रार केली, की त्यांचा मुलगा घरी शिक्षिकेच्या स्तनांबद्दल बोलत होता. त्यामुळे पालकांना वाटलं, की शिक्षिका कदाचित ड्रेस कोडचं पालन करत नसावी. त्यामुळेच मुलाचं लक्ष स्तनांकडे वेधलं गेलं; पण शाळा प्रशासकाने पालकांचा गैरसमज दूर करत संबंधित शिक्षिका नेहमी ड्रेस कोडचं पालन करत असल्याचं सांगितलं.
शिक्षिकेचं म्हणणं आहे, की तिच्या आईवडिलांनी तिच्या शरीराबद्दल कधी तक्रार केली नाही? ती एक हेल्दी स्त्री आहे आणि ती आपलं शरीर लपवू शकत नाही. तिच्या स्तनांबद्दल बोलणारा मुलगा आणि पालक कोण आहेत, हे जाणून घेण्यात तिला रस नाही. कारण ते कळलं तर खूपच वेगळं वाटेल. या प्रकरणी तिला शाळेचं सहकार्य मिळत असून, शाळा हे प्रकरण हाताळत आहे.या शिक्षिकेची ही पोस्ट व्हायरल झाली असून त्यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युझरने कमेंट केली, की जर पालकांनी शाळा प्रशासनाकडे तक्रार केली असली, तरी हे प्रकरण तिथपर्यंतच राहायला हवं होतं. ही माहिती संबंधित शिक्षिकेपर्यंत येणं योग्य नाही. आणखी एकाने लिहिलं, की मुलांना गोष्टी समजावून सांगण्याऐवजी आणि इतरांच्या शरीराचा आदर करायला शिकवण्याऐवजी पालक शाळा प्रशासनाकडे तक्रार करत आहेत. हे योग्य नाही.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.