Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मुंबई :-निकाल बाजूने लावून देण्यासाठी 25 लाखांची लाच घेताना लघुवाद न्यायालयातील अनुवादक दुभाषिक जाळ्यात

मुंबई :- निकाल बाजूने लावून देण्यासाठी 25 लाखांची लाच घेताना लघुवाद न्यायालयातील अनुवादक दुभाषिक जाळ्यात
 

मुंबई :- हॉटेल मालकी हक्काबाबतच्या दाव्यात निकाल बाजूने लावून देण्यासाठी २५ लाख रुपयांची मागणी करुन ती स्वीकारताना लघुवाद न्यायालयातील अनुवादक दुभाषिकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले.

विशाल चंद्रकांत सावंत  (वय ४३) असे लाचखोराचे नाव आहे. याप्रकरणी एका ६६ वर्षाच्या नागरिकाने तक्रार केली होती. तक्रारदार यांचे हॉटेल मालकीहक्का बाबत धोबी तलाव येथील लघुवाद न्यायालयात दावा अंतिम टप्प्यात प्रलंबित होता. या दाव्याचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने लावून देतो, असे सांगून विशाल सावंत यांनी तक्रारदाराकडे २५ लाख रुपयांची लाच मागितली. त्यांनी लाच लुपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यांच्या तक्रारीची पडताळणी पंचासमवेत एल टी मार्ग येथील हॉटेल कामतमध्ये सोमवारी करण्यात आली. त्यानंतर तक्रारदाराकडून २५ लाख रुपये स्वीकारताना विशाल सावंत याला रंगेहाथ पकडण्यात आले.

अपर पोलीस आयुक्त संदीप दिवाण , अनिल घेरडीकर, राजेंद्र सांगळे, सहायक पोलीस आयुक्त शैला कोरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष गुर्जर व त्यांच्या सहकार्‍यांनी ही कारवाई केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.